Thursday, September 19, 2024
Homeनगरशेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे तीन आरोपी जेरबंद

शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे तीन आरोपी जेरबंद

शेवगाव । तालुका प्रतिनिधी

- Advertisement -

शेअर मार्केट गुंतवणूकीत लाखोंची फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध दोन फिर्यादींच्या तक्रारीवरुन दाखल गुन्ह्यातील तीन आरोपींना शेवगाव पोलीस पथकाने शिताफीने सापळा लावून लगतच्या छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यातुन ताब्यात घेतले आहे तर उर्वरित आरोपींच्या मागावर पोलीस आहेत.

दोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात सुमारे ५५ लाख रुपये फसवणूक प्रकरणी सुनिल बाबासाहेब पुरी, बाबासाहेब गोरक्षनाथ पुरी दोघे (रा.रावतळे कुरुडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर), शिवाजी कचरु वंजारी (रा.नजिक बाभुळगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : जायकवाडीची चिंता मराठवाड्यापेक्षा नगर-नाशिकला जास्त

फसवणूक झालेले फिर्यादी संजय सुधाकर जोशी (रा.गदेवाडी ता.शेवगाव जि.अहमदनगर ) यांच्या फिर्यादीवरुन अे.पी. ट्रेडींग सोल्युशन कंपनीच्या नावाखाली एकुण २७ लाख ५० हजार रुपयांची फसवणुक झाल्याचे तर दुसरे फिर्यादी सुभाष जनार्धन आंधळे (रा.सोनेसांगवी ता.शेवगाव जि.अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरुन वेल्थमेकर ट्रेडींग सोल्युशन या कंपनीच्या नावाखाली एकुण २८ लाख १० हजार रुपयांची फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्यावरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी तीन पोलीस पथक शेवगाव, पैठण, अहमदनगर, बीड, पुणे येथे रवाना केले होते. वरील पोलीस पथकाने आरोपींना पळुन जात असतांना सापळा लावुन शिताफीने तीन आरोपींना पैठण व गेवराई अशा ठिकाणांवरुन ताब्यात घेतले.

हे ही वाचा : जिल्ह्यात ‘लाडकी बहीण योजने’साठी तब्बल 7 लाख 8 हजार महिलांचा अर्ज; किती अर्ज ठरले पात्र? आकडेवारी समोर

आज (दि. १० ऑगस्ट) रोजी मा.न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग कोर्ट शेवगाव येथे हजर केले असता न्याायालयाने एकुण तीन दिवसांची पोलीस कस्टडी आदेशित केली आहे. अन्य आरोपींना तांत्रिक विश्लेषनाचे सहाय्याने लवकरात लवकर अटक करण्यात येणार असुन फरार आरोपींच्या मागावर पोलीस पथके शोध कार्यरत आहेत. वरिल आरोपी विरुध्द इतरअन्य कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : ठाकरेंनी घेतली आफ्रिकेत घोटाळा करणाऱ्यांची भेट; शिंदेंच्या खासदाराचे गंभीर आरोप

- Advertisment -

ताज्या बातम्या