Friday, May 3, 2024
Homeजळगावमध्य रेल्वेचा तीन दिवस मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेचा तीन दिवस मेगा ब्लॉक

भुसावळ । प्रतिनिधी bhusawal

मुंबईत (mumbai) मध्य रेल्वेवर (Central Railway) 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी असेल. या मेगा ब्लॉक दरम्यान, शंभर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि माल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ विभागातील दहा गाड्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

या 72 तासांच्या जम्बो मेगा ब्लॉकचे कारण म्हणजे ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान, पाचव्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे या स्थानका दरम्यान सहाव्या लाईनवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. या जम्बो मेगा ब्लॉकमुळे कोकणात जाणार्‍या काही गाड्याही या तीन दिवसांत रद्द करण्यात आल्या आहेत.

भुसावळ विभागातील या गाड्या रद्द

शुक्रवार दि.4 आणि शनिवार दि. 5 रोजी 12112 अमरावती – मुंबई मेल एक्सप्रेस, 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम मेल एक्सप्रेस, 17611 नांदेड-मुंबई राज्यराणी मेल एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तर शनिवार दि.5 आणि रविवार दि. 6 रोजी 12071 मुंबई-जालना मेल एक्सप्रेस, 12072 जालना-मुंबई मेल एक्सप्रेस, 12109 मुंबई-मनमाड मेल एक्सप्रेस, 12110 मनमाड-मुंबई मेल एक्सप्रेस, 12111 मुंबई-अमरावती मेल एक्सप्रेस, 12139 मुंबई – नागपूर सेवाग्राम मेल एक्सप्रेस, 17612 मुंबई-नांदेड राज्यराणी मेल एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या