नाशिक | Nashik
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत पुन्हा मोठी वाढ झाली असून यंदाच्या हंगामातील गोदावरीला दुसरा पूर आला असून अजूनही पूरस्थिती कायम आहे. अशातच आता या मुसळधार पावसामुळे नाशिक शहरासह ग्रामीण भागात तीन दुर्घटना घडल्या आहेत.
हे देखील वाचा : Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर
यातील पहिली घटना नाशिक येथील भगूरमध्ये तुळसा लॉन्स जवळील, नगरपालिका हद्दीत घडली आहे. याठिकाणी पाईपलाईनचे काम चालू असतांना त्यात नगरपालिकेच्या वतीने खड्डे खोदले होते. त्या खड्ड्यात काल रात्री ९ वाजेच्या सुमारास अमित (बंटी) गाढवे (अंदाजे २८ ते ३० वर्ष) हे त्या खड्डयात गाडीसह पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला.
हे देखील वाचा : Nashik Rain Update : मनमाड, येवला, चांदवडसह निफाडकरांना दिलासा
तर दुसऱ्या घटना ही बागलाण तालुक्यात (Bagalan Taluka) घडली आहे. कालपासून तालुक्यात सातत्याने पाऊस कोसळत असल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे प्रशासनाडून सर्व पंचनामे करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. तसेच तिसरी घटना सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) घडली आहे. तालुक्यातील मौजे गोगुळ येथील अर्जुन घुले यांच्या घराची भिंत पडून सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा