इगतपुरी । वाल्मीक गवांदे Igatpuri
आज मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटात कारच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. रियाज हासियत अली, आसादुला अली, अफजल बैतुलहा सर्व राहणार उत्तर प्रदेश अशी मृतांची नावेआहेत.
हे मुंबई नाशिक महामार्गावर तीव्र वळणावर उतार उतरत असताना हा भीषण अपघात झाला. यावेळी अपघातग्रस्त कारने जागेवर तीन पलट्या मारल्याने गाडीचा पूर्ण पणे चुरा झाला होता. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असतांना मुंबई – नाशिक महामार्गवरील कसारा जवळील ऑरेंज हॉटेलच्या समोर अपघात झाल्याची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलीस पथक व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य, कसारा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले.
रुग्णवाहिकेच्या मदतीने अपघात ग्रस्तांना कसारा व खर्डीच्या शासकीय रुग्णालयात दखल केले. या प्रकरणी कसारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित, सहायक पोलीस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करीत आहेत.




