Monday, June 24, 2024
Homeदेश विदेशFire Cracker Factory : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ३ जणांचा मृत्यू

Fire Cracker Factory : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

पश्चिम बंगालमधील (West Bengal) उत्तर २४ परगणा येथील दत्तपुकुर भागात (Dattapukur Area) फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट (Firecracker Factory) झाल्याने ३ जणांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. तसेच या स्फोटात अनेक घरांचे नुकसान झाले असून स्फोटात किमान ६ ते ७ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे….

नाशकात खुनाचे सत्र सुरूच; किरकोळ वादातून युवकाची हत्या

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील इग्रा, बाजबझनंतर दत्तपुकुरमध्ये एका बेकायदेशीर (Illegal) फटाक्यांचा कारखाना होता. त्या कारखान्यात हा स्फोट (Explosion) झाला आहे. तर स्फोटानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना (injured) उपचारासाठी पश्चिम बंगालमधील बारासात येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दत्तपुकुर पोलीसांनी (Police) दिली आहे.

India Alliance : ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? मुंबईतील बैठकीआधी कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती

दरम्यान, यापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील (Medinipur District) इग्रा येथे बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. तसेच याप्रकरणी आरोपींना (Accused) अटक देखील करण्यात आली होती. इग्रा हे क्षेत्र ओडिशाच्या सीमावर्ती राज्याच्या सीमेजवळ आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

उत्तर नाही, उत्तरदायित्वाची सभा! अजित पवारांच्या बीडच्या सभेचा टीझर लाँच, शरद पवारांचा फोटो वापरणे टाळले

- Advertisment -

ताज्या बातम्या