Saturday, April 26, 2025
Homeक्राईमNashik Crime News : माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर प्राणघातक हल्ला; दोघे गंभीर

Nashik Crime News : माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर प्राणघातक हल्ला; दोघे गंभीर

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

रस्त्यावर वाढदिवस साजरा करून धिंगाणा घालणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून टोळक्याने केलेल्या हल्ल्यात (Attack) माजी नगरसेविका आणि प्रभाग समितीच्या सभापती जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल व किरण खर्जुल यांच्यासह अजून दोन जणांवर चाॅपरने वार करण्यात आले आहेत. पोटात आणि पाठीवर चाकुचे वार झाल्याने नितीन आणि किरण खर्जुल हे दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जयराम हॉस्पिटल (Jairam Hospital) येथे आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. तर उर्वरित दोघांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात (Nashik Road Area) एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, हा प्रकार सोमवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान नाशिकरोड पूर्व भागातील मोरया पार्क, खर्जुल मळा येथे घडला आहे. माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल यांच्यावर सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. खर्जुल मळा येथील मोरया पार्क येथे रात्री एकाचा वाढदिवस (Birthday) साजरा करण्याच्या कारणातून नितीन खर्जुल यांच्यासह तीन जणांवर हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. यातील नितीन खर्जुल हे माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती आहेत. तर किरण खर्जुल हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच जयराम हॉस्पिटल बाहेर खर्जुल यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती.

दरम्यान, वाढदिवस साजरा करत असताना परिसरात धिंगाना घालणाऱ्यांना नितीन खर्जुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी हटकले असता रवींद्र गाढवे व त्याचा भाऊ संदीप गाढवे यांच्यासह पाच ते सहा संशयितांनी धारदार शस्त्राने खर्जुल व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी खर्जुल यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे (Nashik Road Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तसेच नाशिकरोड परिसरात टोळक्यांचा धुमाकूळ वाढत चालला असून पोलिसांनी त्यावर वेळीच कठोर कारवाई करून आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...