Saturday, April 26, 2025
HomeनाशिकNashik News : सिलेंडरच्या स्फोटात तिघे जखमी; मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

Nashik News : सिलेंडरच्या स्फोटात तिघे जखमी; मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

येथील स्टेट बँक चौक चौपाटीवर सोमवार (दि. २९) रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हातगाडीला आग (Fire) लागल्याने काही वेळात सिलेंडरचा स्फोट (Cylinder Explosion) होऊन झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, स्टेट बॅंक चौपाटी येथे रात्री अडीच वाजेच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती समजताच अग्निशामक दल (Fire Brigade) व अंबड पोलीस ( Ambad Police) तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी अंबड पोलिसांनी तात्काळ स्टेटबॅंक चौपाटीचे अध्यक्ष राहुल गणोरे यांना २ वाजून ४० मिनिटांनी सदर घटनेची माहिती दिली. गणोरे तात्काळ चौपाटी येथे पोहोचल्यावर येथील अंडाभुर्जी गाडीचे मालक अनुपसा व चायनिज टाऊनचे मालक किशन थापा यांच्या मालकीच्या गाड्यांना आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, यावेळी अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत असतांना अचानक एका सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे अग्निशामक दलाचे जवान राजेश हाडस, राहुल गणोरे व अमोल खांडरे हे जखमी झाले. यावेळी नवीन नाशिक अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. यावेळी अग्निशामक दलाचे अविनाश सोनवणे, के. के. पवार, पार्थ शिंदे, अजिंक्य वझरे, वाहनचालक आय. आय. काझी व एस. डी. घुगे यांनी परिश्रम घेत आग आटोक्यात आणली. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

PM Shahbaz Sharif : “भारताने जर आमचं पाणी रोखलं तर…”; पाकिस्तानचे...

0
नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने (India) कठोर भूमिका घेत पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार (Indus Water...