Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनांदुरमध्यमेश्वरमध्ये पक्ष्यांच्या तीन दुर्मिळ प्रजातींचे दर्शन

नांदुरमध्यमेश्वरमध्ये पक्ष्यांच्या तीन दुर्मिळ प्रजातींचे दर्शन

पक्षी अभयारण्यात अवघ्या 2 फ्लेमिंगो वास्तव्यास

नाशिक । प्रशांत निकाळे

‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून डॉ. सलीम अली यांनी ओळख दिलेल्या, ज्यात पक्ष्यांच्या सुमारे 230 प्रजाती, 460 प्रजातींचे वनस्पती आणि जवळजवळ 24 माशांच्या प्रजाती आहेत, असे नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रत राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे. या वर्षी पक्षीप्रेमिना पक्ष्यांच्या तीन दुर्मिळ प्रजातींनी दर्शन दिले आहे. या पक्ष्यांच्या तीन प्रजाती क्वचितच दृष्टीस पडतात असे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे.

- Advertisement -

पक्ष्यांच्या बूटेड वॉबलर, लिटल क्रेक आणि स्पॉटेड क्रेक या प्रजाती पक्षीप्रेमींनी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पाहिल्या आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा पक्षांचे स्थलांतर खूप कमी आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या भागात अजूनही पाण्याची पातळी उंच आहे. यावर्षी तापमानात घट होत नसल्याचा परिणामही स्थलांतरांवर झाला आहे, अशी माहिती वन अधिकारी अशोक काळे यांनी दिली.

त्यांनी देशदूतशी बोलतांना सांगितले की, अगोदर दिसलेल्या फ्लेमिंगोच्या कळपाने अभयारण्य सोडले आहे. येथे आता फक्त दोनच फ्लेमिंगो वास्तव्यास आहेत. नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांसाठी अद्याप परिस्थिती साजेशी नाही. वातावरणाची परिस्थिती बदलेल अशी आशा आम्हाला आहे. आतापर्यंत येथे सुमारे 18,000 पक्ष्यांची गणना केली आहे.

गंगापूर व दारना जलसाठ्यातून पाणी सोडले की, हे पाणी नांदूरमध्यमेश्वर येथे साठवले जाते व नंतर येथून कालव्यांद्वारे पुढे सोडले जाते. नांदूरमध्यमेश्वरमध्ये पाण्याची पातळीत नेहमीच चढउतार होत असते. दरवर्षी पाण्याच्या प्रवाहात वाहून नेणारी बरीच माती काठावर जमा होतात. अशाप्रकारे येथे मातीची बेटे आणि उथळ पाण्याचे तलाव तयार झाले आहेत. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या