Saturday, July 27, 2024
Homeनाशिकजुन्या नाशकात तीन दुकानांना आग

जुन्या नाशकात तीन दुकानांना आग

जुने नाशिक/ प्रतिनिधी

जुने नाशिकच्या चौक मंडई भागात असलेल्या जहांगीर मशीद शॉपिंग सेंटर मधील तीन गाळ्यांना भीषण आग लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisement -

स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले असून घटनास्थळी नुकतेच अग्निशामक दलाचे बंब देखील दाखल झाले आहेत.

दुकाने बंद असल्यामुळे जीवित हानी झाली नाही. ही घटना पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली . आगीचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हे तिन्ही दुकाने धार्मिक साहित्य विक्रीसह जनरल साधने विक्रीची असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या