Sunday, November 24, 2024
HomeनाशिकNashik Suicide News : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची आत्महत्या

Nashik Suicide News : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची आत्महत्या

नाशिक | Nashik

शहर परिसरात विविध घटनांमध्ये तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. याबाबत आकस्मिक मृत्यूच्या नाेंदी पाेलीस ठाण्यांत (Police Station) करण्यात आल्या आहेत. यातील पहिली घटना ही पंचवटीतील (Panchvati) टकलेनगरमध्ये घडली आहे. येथील विनोद शंकरराव देशमुख (५५, रा. साई विहार बंगलो, टकलेनगर, पंचवटी) यांनी रविवारी (दि. १४) सकाळी बंगल्यातील खोलीत नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. कारण अद्याप अस्पष्ट आहे. अमित पवार यांच्या माहितीनुसार पंचवटी पोलिसात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले; अंजनेरी गडावरचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर

तर दुसरी घटना गंगापूर शिवारात (Gangapur Shivar) घडली आहे. येथील पल्लवी निलेश जाधव (२९, रा. स्वामी दर्शन अपार्टमेंट, ध्रुवनगर) यांनी घराच्या बेडरुममध्ये रविवारी (दि. १४) सकाळी पावणे बाराच्या सुामरास साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल केले असता तपासून मयत घोषित करण्यात आले. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून,  गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दहशत माजविणाऱ्या गुंडांची टोळी गजाआड

तर तिसरी घटना जुने सिडको परिसरात (Cidco Area) घडली आहे. येथील ईश्वर प्रभाकर मोरे (३४, रा. औंदुबर स्टॉप, जुने सिडको) यांनी रविवारी (ता. १४) रात्री सव्वा आठच्या सुमारास घरात बांधलेल्या झोळीच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान, इश्वर याचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून, आत्महत्त्येमागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अंबड पोलिसात (Ambad Police) अकस्मात मृत्युची नोंद केली असून, सहायक उपनिरीक्षक हारुण शेख हे तपास करीत आहेत. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या