Wednesday, February 4, 2026
HomeनगरTeacher Awards 2025 : तीन शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार; नेवासा, शेवगाव व...

Teacher Awards 2025 : तीन शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार; नेवासा, शेवगाव व अकोले तालुक्यातून प्रत्येकी एक

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार नगर जिल्ह्यातील तीन शिक्षकांना जाहीर झाला आहे. यामध्ये माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक आणि आदिवासी शिक्षक यांचा समावेश आहे.

- Advertisement -

राज्य सरकारच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. प्राथमिक शिक्षक विभागात शितल मोहन झरेकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव ता. नेवासा), माध्यमिक शिक्षक विभागात विद्या रामभाऊ भडके शिवाजी हायस्कूल (बोधेगाव ता. शेवगाव) आणि तिसरा पुरस्कार आदिवासी विभागातून अनिल सिताराम डगड (शिळवंडी ता. अकोले) यांना जाहीर झाला आहे.

YouTube video player

येत्या २२ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये या राज्यशिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून राज्यातील १०९ शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामध्ये प्राथमिक शिक्षक ३८ माध्यमिक शिक्षक ३९ आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक १९ आठ विभागातून थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार ८ विशेष कला क्रीडा दोन दिव्यांग शिक्षक एक स्काऊट गाईड दोन असे १०९ पुरस्कार दिले जाणार आहेत.

ताज्या बातम्या