Tuesday, May 21, 2024
Homeनंदुरबारतलावडी येथे'विठ्ठला'ने साकारले तीन हजार झाडांचे जंगल

तलावडी येथे’विठ्ठला’ने साकारले तीन हजार झाडांचे जंगल

नंदुरबार ।Nandurbar। प्रतिनिधी

तळोदा Taloda येथील प्रा.विठ्ठल सी. मगरे Prof. Vitthal c. Magare व सौ.सुशिला विठ्ठल मगरे Mrs. Sushila Vitthal Magareया वृक्षप्रेमी दाम्पत्याने गेल्या तीस वर्षात तलावडी Talawadi ता.तळोदा येथे शासनाच्या सुधारीत वृक्षपट्टा योजनेंतर्गत tree lease scheme वृक्षलागवड करुन छोटे जंगल Small forest विकसीत केले आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध राज्यात राबविलेल्या या योजनेत फक्त मगरे दाम्पत्य यशस्वी झाले आहेत. या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे कौतूक करण्यात येत आहे.

- Advertisement -

या धरतीवर वृक्ष असावेत, 33 टक्के भुभाग वनाच्छादीत असावा यासाठी महसूल व वनविभागाने सन 1986, 1989 व 1990 असे तीन शासन निर्णय काढून सामाजिक वनीकरण विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्हयात वृक्षपट्टा योजना तयार करुन सरकारी जमिनीचे वाटप केले. त्यानुसार सन 1989 मध्ये तत्कालीन धुळे जिल्हा असतांना तळोदा येथील प्रा.विठ्ठल सी.मगरे व सौ.सुशिला मगरे यांना शासनाच्या वृक्षपट्टा योजनेंतर्गत 2 हेक्टर जमिन मिळाली होती. तळोदा, शहादा, नवापूर, नंदुरबार, धुळे या तालुक्यातील 19 वृक्षपट्टयांसाठी सुमारे 70 हेक्टर जमिन वितरीत करण्यात आली होती.

सरकारी जमिन आहे म्हणून काहीही पेरा आणि पिके घ्या असा हा प्रकार नव्हता. शासनाच्या धोरणानुसार व अटी आणि शर्थीप्रमाणे फक्त मोठी झाडेच लावणे बंधनकारक होते. त्याप्रमाणे 1989 मध्ये तळोदा येथील सामाजिक वनीकरण विभाग व वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सौ.सुशिला व प्रा.विठ्ठल मगरे यांनी या वृक्षपट्टयावर वृक्षांची लागवड करुन वृक्ष संवर्धन व संरक्षणाची जबाबदारी घेतली होती.

या वृक्षपट्टयावर बांबू, खैर, साग आदी तीन हजार झाडांची लागवड केली. या वृक्षपट्टयात 45 प्रजाती संख्या आहे. यात साग 1 हजार, सुबाभुळ 100, आंबा-50, आपटा, अशोक, अमलताश आवळा, हिरडा, बेहडा, वड, पिंपळ, औदुंबर, चंदन, चारोळी, चिंच, बांबु 100, बदाम, सिताफळ 50, रामफळ 50, खिरणी-कळण (पिवळा) मोहा आदी 200 झाडांचा समावेश आहे. ज्यांनी ज्यांनी शासनाच्या धोरणानुसार अटी व शर्थींचे पालन केले नाहीत, त्यांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या. पण मगरे दाम्पत्याने नियमांचे पालन केले. त्याचबरोबर खूप परिश्रम घेतले, पैसा लावून स्वखर्चाने वृक्षपट्टा साकारला.

1990 ते 2000 पर्यंत लोकांनी त्यांना त्रासही दिला. झाडांचे नुकसानही केले. मात्र त्यांनी न घाबरता वृक्षसेवा सुरुच ठेवली. सद्यस्थितीत हा वृक्षपट्टा खूप बहरला आहे. साग, शिवण, सुरु, सुबाभूळ, आपटा, अमलताश, अशोक, आंबा, वड, पिंपळ, औदुंबर, चंदन, चारोळी, चिंच, आवळा, हिरडा, बेहडा, शिरस, बावळ करंज, मोहा, फणस, खिरणी, पळस, पिंपरी आदी 2 हजार झाडांचे छोटे जंगलच त्यांनी साकारले आहे. या वृक्षपट्टयांमधुन मिळालेल्या उत्पन्नातून 20 टके महसुल त्यांनी शासनाला जमा केले आहे. असे जंगल असलेला वृक्षपट्टा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात एकमेव आहे.

वृक्षपट्टयाच्या माध्यमातून शासनाला महसूल मिळाला. याशिवाय दुर्बल घटकातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 30 वर्षात या दाम्पत्याने रोजगारपोटी सुमारे 10 लाख मजुरी दिली. ग्रामस्थांना वस्तु रुपाने लाकुटफाटा, गवत, चारा-बांबु तथा झाडांंच्या दांडया उपलब्ध करुन दिल्या. गरीब लोकांना जाळण्यासाठी जळाऊ लाकड़े उपलब्ध करुन दिली.

सामाजिक वनीकरण धुळे व तहसिलदार तळोदे यांनी रितसर परवानगी घेवुन वीज मंडळाकडून कुपनलिकांवर वीजमोटर लावल्याने 1 लाख 80 हजार वीज बिल जमा झाले. त्यामुळे वृक्षपट्टयामुळे वीज मंडळालाही आर्थिक लाभ मिळाला. वृक्षपट्टयात त्यांनी 1995 मध्ये पाच शेततळे तयार केलीत.

त्या 20 वर्षात दरवर्षी पावसाचे पाणी साचून शेततळ भरली जाऊन जमिनीत पाणी मुरले. शिवाय निसर्गत:च वृक्षपट्टयाची जमीन चढउताराची आहे. वृक्षपट्टयाच्या चतु:सिमेवर मातीचा बांध बांधला आहे. या सर्व कारणांनी शेतातील पाणी शेतातच जाते अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या जमिनीवर सेंद्रीय खत तयार होत असते. बाराही महिने खतामध्ये गांडूळसारखे जीव-जंतु कृमी मिटवा मधमाशा आदी हजारो जीवांचे हा वृक्षपट्टा आश्रयस्थान आहे. याठिकाणी बिबटे, वाघही आश्रय करतात.

1990 पासून 3000 झाडांचे जंगल असलेल्या या वृक्षपट्टयातील हजारो झाड रोज वातावरणात प्राणवायु सोडतात व वातावरणातून कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषुन घेऊन वातावरणात शुद्ध करतात.त्यामुळे हा प्राणवायु तयार करण्याचा जणू कारखानाच म्हणावा असे काम याठिकाणी करण्यात आले आहे.

याबाबत सौ.सुशिला मगरे यांनी सांगितले, माझी मुलं बालपणापासून रोपवाटिकेमध्ये कमवा आणि शिका योजनेखाली शालेय रोपवाटिकेत पक्षपट्टयातील रोपवाटिकेत श्रमदान करत होते. माझे पती सेवानिवृत्त अध्यापक आहेत. ते 1982 पासून शालेय रोपवाटिका व किसान रोपवाटिका योजना राबवुन सामाजिक वनीकरण व वनविभागाला सहकार्य करीत आले आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे वनश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

वृक्षप्रेम म्हणून त्यांनी शालेय रोपवाटिकांमध्ये लाखो वृक्ष निर्माण करीत कमवा व शिका योजनेखाली विद्यार्थ्यांना प्रेरणा देत होते. त्यांना 1997-98 मध्ये निसर्ग विद्यारत्न पुरस्कार अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे प्रदान करण्यात आला. याशिवाय पर्यावरण रक्षक पुरस्कार, संत सावता वृक्षमित्र भुषण पुरस्कार, सौ.रोहिणी रविंद्र जाधव ट्रस्टतर्फे निसर्ग व पर्यावरण मित्र पुरस्कार, असे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा वृक्षपट्टा साकारला आहे.

पुढील वृक्षयोजना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येईल. रक्तचंदन प्रकल्प, सुधारित सागवान प्रकल्प, बाल्कुवा बांबू प्रकल्प, महोगनी वृक्ष प्रकल्प, औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प आदी प्रकल्प राबविण्याचा मानस आहे.

– सौ. सुशिला विठ्ठल मगरे वृक्षपट्टा लाभार्थिनी, तळोदा

- Advertisment -

ताज्या बातम्या