Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरस्ता ओलांडणार्‍या तीन महिलांना ट्रकची धडक; एका महिलेचा मृत्यू; दोघी जखमी

रस्ता ओलांडणार्‍या तीन महिलांना ट्रकची धडक; एका महिलेचा मृत्यू; दोघी जखमी

चांदवड । प्रतिनिधी Chandwad

बस पकडण्यासाठी महामार्ग चौफुलीवर जाण्यासाठी रस्ता ओलांडणार्‍या तिघा महिलांना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर दोघी गंभीररित्या जखमी झाल्या. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

लासलगाव येथे कार्यक्रम करून मालेगाव येथील गुणमाला श्रीपाल पहाडे (65) आणि अनिता विनोद पहाडे(56) व सुशीला विलास पहाडे (60) या तीनही महिला बसने चांदवड येथे उतरल्या मालेगावसाठी बस स्टैंडवर बस येणार नाही म्हणून महामार्गावर पेट्रोल पंपा समोर येत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रक क्र. एम. एच 19 सी. वाय 9313 ने रस्ता ओलांडणार्‍या तिघा महिलांना जोरात धडक दिली.

YouTube video player

या धडकेत गुणमाला पहाडे यांचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला ,सुशीला पहाडे यांच्या पायावरून ट्रक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना शहरातील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर अनिता पहाडे यांना किरकोळ मार लागल्याने सिव्हिल रूग्णालयात उपचार केले गेले.

या अपघाताचे वृत्त समजताच माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, चांदवड मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नंदकुमार कासलीवाल,मांगीतुंगी ट्रस्ट संचालक वर्धमान पांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मदत कार्य सुरू केले.

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...