Monday, June 24, 2024
Homeनगरजिलेटीन स्फोट प्रकरणी ठेकेदारावर गुन्हे दाखल

जिलेटीन स्फोट प्रकरणी ठेकेदारावर गुन्हे दाखल

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

- Advertisement -

तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथिल विहीर कामात जिलेटीन होल मध्ये भरताना झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यु तर तीन जण जखमी झाले या प्रकरणी विहरीचा ठेकेदार संजय शामराव इथापे यांच्यावर मृत्यूस कारणीभूत झाले प्रकणात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत नागनाथ भालचंद्र गावडे ( 29, रा. बारडगाव ता.कर्जत) व सुरज ऊर्फ नासीर युसुफ इनामदार (25), गणेश नामदेव वाळुंज (25, सर्व रा. टाकळीकडेवळीत, ता.श्रीगोंदा) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. तर वामन गेणा रणसिंग, रविंद्र गणपत खामकर, जब्बार सुलेमान इनामदार (सर्व रा. टाकळीकडेवळीत ता. श्रीगोंदा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत स्फोटक पदार्थ वापरण्याचे प्रशिक्षण नसताना सुरक्षितता नसताना स्फोटक हाताळण्यासाठी दिले असल्याने होल मध्ये जिलेटीन कांड्या भरण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि.15) रोजी सांयकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ठेकेदार संजय शामराव इथापे (रा.टाकळीकडेवळीत, ता.श्रीगोंदा) याने वामन गेणा रणसिंग यांचे शेतातील विहीरीवर मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसताना व ब्लास्टींग करणारे प्रशिक्षित (डिलर फायर) उपलब्ध नसताना, तसेच स्फोटक पदार्थ वापरण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना, व सदर स्फोटक पदार्थांचे काम हे अत्यंत धोकादायक असल्याचे व त्यामुळे एखादयाचा जीव जावु शकतो हे माहीत असताना ही मजुरीवर काम करणारे जब्बार इनामदार, सुरज ऊर्फ नासीर इनामदार, गणेश वाळुंज, नागनाथ भालचंद्र गावडे यांना विहीरीमध्ये ब्लास्टींग ट्रॅक्टरच्या मशीन ने होल करुन त्यामध्ये ब्लास्टींगचे जिलेटीन कांडया भरण्या करीता प्रवृत्त केले.

तसेच पोकलँन मशीनच्या सहाय्याने विहिरीत उतरवले. त्याचे सांगणेवरुन वरील मजुर हे कोणतेही सुरक्षा साधने नसताना विहीरीमध्ये होल करुन ब्लास्टींगचे जिलेटीन कांडया होल मध्ये भरण्याचे काम करत असताना विहीरीमध्ये मोठा स्फोट झाला. आत काम करणारे वरील चौघेही स्फ़ोटाच्या दणक्याने विहीरीच्या बाहेर गंभीर जखमी अवस्थेत पडले. यात सुरज इनामदार, गणेश वाळुंज, नागनाथ गावडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तसेच तिघांच्या दुखापतीस कारणीभूत झाल्यावरून शामराव इथापे (रा. टाकळीकडेवळीत, ता. श्रीगोंदा) याचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक. ज्ञानेश्वर भोसले करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या