नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील उपनगर, पंचवटी व मुंबईनाका पाेलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या तिघा तरुणांनी (Youth) आत्महत्या (Suicide) केल्या आहेत. तिन्ही घटनांचे कारण समाेर आले नसून आकस्मिक मृत्यूच्या (Death) नाेंदीन्वये तपास सुरु झाला आहे.
हे देखील वाचा : “नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे कटकारस्थान करून…”; अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप
यातील पहिली घटना काैटुंबिक वादानंतर पत्नी चार महिन्यांपासून माहेरी गेल्याने नैराश्य पचविणाऱ्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वाल्मिक बाळासाहेब राऊत (वय २७, रा. ओमकार अपार्टमेंट, औटे मळा, नाशिकराेड) असे मृत पतीचे नाव आहे. वाल्मिक याचा काही महिन्यांपूर्वूच विवाह झाला हाेता. त्यातच काैटुंबिक कलहामुळे गेल्या चार महिन्यांपासून त्याची पत्नी माहेरी गेली. त्यामुळे ताे तणावात हाेता. रिलायन्स टीव्ही शाेरुमला काम करुन ताे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत हाेता. दरम्यान, (दि. १५) राेजी रात्री नऊ वाजता वाल्मिकने घरातील गॅलरीत जाऊन उपरण्याने गळफास घेतला. घटनेनंतर वडील बाळासाहेब यांनी रुग्णालयात (Hospital) दाखल केले असता, मृत घाेषित करण्यात आले. या आकस्मिक मृत्यूच्या नाेंदीचा तपास उपनगर पाेलीस ठाण्याचे हवालदार प्रभाकर बाेडके करत आहेत. दरम्यान, वाल्मिकची पत्नी त्याच्याकडे घर नावावर करुन घेण्यासाठी तगादा लावत असल्याचा आराेप कुटुंबाने (Family) केला आहे.
हे देखील वाचा : मविआचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेच्या रकमेत किती वाढ करणार? राऊतांनी थेट आकडाच सांगितला
दुसरी घटना परराज्यातून मित्राच्या सासूरवाडीला फिरण्यासाठी भारतनगराच आलेल्या मजूर तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना मुंबईनाका परिसरात (Mumbai Naka Area) घडली आहे. दुर्गेश केवल मेहरा (वय २५) असे मृताचे नाव आहे. दुर्गेश हा परराज्यातून मुंबईनाका हद्दीतील भारतनगरात राहणाऱ्या मित्राकडे भेटण्यासाठी व फिरण्यासाठी आला हाेता. त्यातच, त्याने काहीतरी कारणातून (दि.१५) दुपारी घरातच काहीतरी विषारी औषध प्राशन केले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपास हवालदार विजय म्हैसधुणे करत आहेत.
हे देखील वाचा : शरद पवारांचे राज्यातील तणावपूर्ण स्थितीवर मोठे विधान; म्हणाले, “ शांतता प्रस्थापित करायची असेल तर…”
तर तिसरी घटना पंचवटी परिसरात (Panchvati Area) घडली आहे. पंचवटीतील म्हसरुळ -मखमलाबाद लिंक राेडवरील प्लेबाॅक्स क्रिकेट ग्राऊंडवरील एका केबिनमध्ये हर्षल संजय साेनकांबळे (वय २२) याने शुक्रवारी (दि. १६) गळफास घेऊन आत्महत्या केली. हर्षल हा माेलमजुरी करत हाेता. त्याने काहीतरी विवंचनेतून जीवन संपविले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार असून ताे अविवाहित हाेता. तपास पंचवटी पाेलीस ठाण्याचे हवालदार डी. बी. शेळके करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा