सौ.वंदना अनिल दिवाणे
जन्मतारखेनुसार भविष्य..
28 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. फार विचारशील आहात. निसर्गाचा अभ्यास करण्याची आवड आहे. उद्योगशील आहात. कोणतेही काम हाती घेतले की जलद गतीने करणे आवडतेे. भाषाविषयावर चांगले प्रभुत्व आहे. सौंदर्याचे वेड आहे. पैसा मिळवण्यासाठी जीवनात अनेक संधी प्राप्त होतील. इतरांचा विश्वास संपादन केल्यामुळे सतत पदोन्नती होत राहील.
29 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. कल्पनाशक्ती फार चांगली आहे. बौद्धिक क्षमता चांगली आहे. नाविन्य व बदलाची आवड आहे. बौद्धिक कसरत असलेल्या विषयात जास्त रस आहे. या कामाद्वारे विपुल धनप्राप्ती होईल. पण पैसा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्यास उद्योगाचे प्रमुख होऊ शकाल.
30 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास तुला आहे. आहे त्या परिस्थितीतून वर येण्याची सतत महत्त्वाकांक्षा राहील. त्यासाठी जीतोड मेहनत कराल. प्रगतीच्या कोणत्याही टप्प्याने तुमचे समाधान होणार नाही. एक टप्पा गाठला की, लगेच पुढच्या टप्प्यासाठी तुमची घोडदौड चालू होईल. वास्तविक धनप्राप्तीच्या बाबतीत काळजी करावे असे काही नाही. पण चिंता करण्याच्या सवयीमुळे एकाचवेळी अनेक उद्योग करूनही समाधान वाटते.
1 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, हर्षल, शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, समाजाचा,उद्योगाचा प्रमुख नेता बनवले जाईल. जेथे जाल तेथे महत्त्व प्राप्त होईल. जीवनस्तर वृद्धी करतांना बौद्धिक स्तर वाढविण्यासाठी संधी मिळेल. पत्येक गोष्टीत तडजोड करून मानसिक शांती मिळविण्याचा तुमचा प्रयत्न कराल. रूळलेल्या रस्त्याने न जाता बौद्धिक क्षमतेच्या जोरावर वेगळे मार्ग काढून भरपूर पैसा मिळवण्यात यश मिळेल.
2 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी, नेपच्यून, चंद्र, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. सर्व प्रगती रूळलेल्या मार्गाने न जाता जन्मतः प्राप्त दैवी सामर्थ्याच्या अथवा प्रतिभेच्या जोरावर होईल. आपल्या योजनेचा परिपाठ किंवा शेवट तुम्हाला सोपा जाईल. स्वतः घेतलेल्या निर्णयामधून तुम्हाला चांगले यश मिळेल. पैशांच्या बाबतीत दुसर्याला सल्ला घेणे महाग पडेल, स्वनिर्णयाने धनी व्हाल.
3 ऑेक्टोबर – वाढदिवस असलेल्या गुरू ,शनी, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. गुरूचा प्रभाव अधिक असल्याने इच्छाशक्ती व निश्चयात्मक बुद्धी प्रबळ राहील. ग्रहांची चौकट इतकी प्रबळ आहे की, कोणतेही करिअर असेना यश स्वतःहून तुम्हाला शोधत येईल. बरोबरीच्या लोकांपेक्षा बराच वरचा दर्जा प्राप्त कराल. प्रत्येक काम मनापासून केल्यामुळे त्यातून उत्तम मानसिक समाधान प्राप्त होईल. आर्थिक बाबतीत भाग्याची साथ मिळणार असल्याने स्त्री वर्ग व मित्र सहकार्याने श्रीमंत व्हाल.
4 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, सूर्य, शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास तुला आहे. हर्शल शनीच्या प्रभावामुळे जीवन इतरांपेक्षा एकदम वेगळे राहील. आपण नियतीच्या हातातील बाहुले आहोत. आपले जीवन आपल्या हातात नाही असे सारखे वाटेल. यालाच दैववाद म्हणतात. आर्थिक प्रगतीसाठी सुरूवातीच्या आयुष्यात बराच संघर्ष करावा लागेल. उत्तरार्धात मात्र आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.