Friday, May 3, 2024
Homeनाशिकशालेय विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी बालरोगतज्ज्ञ संघटना राबविणार संकल्प

शालेय विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी बालरोगतज्ज्ञ संघटना राबविणार संकल्प

नाशिक | प्रतिनिधी

अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या माध्यमातून यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी ‘संकल्पः संपूर्ण स्वास्थ्य’ उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरीक व मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.रमाकांत पाटील, नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध भांडारकर यांनी पत्रकार परीषदेत दिली.

- Advertisement -

डॉ. पाटील म्हणाले,संघटनेच्या इतिहासात प्रथमच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर आणि त्यांचे सहकारी डॉ. रेखा हरीश, डॉ. दीपक पांडे आदींनी २०२३ यावर्षात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून ‘संकल्पः संपूर्ण स्वास्थ्य’ राबविण्याचे ठरविले आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती व सूचना केल्या जात असतात. यामध्ये चौरस आहार घ्यावा. तसेच जंक फूड (सत्त्वहीन पदार्थ) टाळण्यासाठी जानजागृती, दैनंदिन व्यायामाचे महत्त्व, मोबाईल, टीव्ही आदी गॅझेटचा मर्यादित वापर, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना, आनंददायी वातावरण ठेवण्यासह पुरेशी व गाढ झोपेचे महत्त्व. व्यसनांचे दुष्परीणाम व व्यवनाधिनतेपासून दूर राहाण्यासाठी प्रोत्साहन. प्रदूषण रोखण्यासाठीदेखील मार्गदर्शन केले जाणार आहे. हे प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना देऊन शाळा हे आरोग्य संवर्धनाचे साधन व्हावे, अशी बालरोगतज्ज्ञ संघटनेची अपेक्षा आहे.

नवरचना शाळेपासून शुभारंभ

‘संकल्प’ प्रकल्पाची कार्यशाळा आज नव रचना विद्यालय येथे घेतांना उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शाळेतील नववी अ आणि नववी बच्या वर्गातील मुलांसाठी कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून डॉ.उपेंद्र किंजवडेकर, डॉ साधना पाटील, डॉ अतुल कणीकर, डॉ सुलभा पवार, डॉ तृप्ती महात्मे, डॉ रिना राठी यांनी सेवा दिली. प्रकल्प समन्वयक म्हणून महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील यांच्यासह े मुख्याध्यापक किशोर पालखेडकर, शीतल पवार, चांदगुडे यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेस डॉ अमोल पवार , डॉ. श्याम चौधरी, डॉ मिलिंद भराडिया , डॉ अनिरूध्द भांडारकर , डॉ सचिन पाटील या पदाधिकार्यांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या