– सौ.वंदना अनिल दिवाणे
जन्मतारखेनुसार भविष्य..
24 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध,शुक्र, सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. शुक्राच्या प्रभावामुळे सर्वांशी वागणूक सहानूीभुतीपूर्वक राहील. प्रेमाला फार महत्व राहील. हे आदर्श प्रेम असल्यामुळे विकाराचा मुळीच भाग नसेल. कोणाशीही सहज मैत्री होईल. त्यामुळे मित्रसंख्या मोठी राहील. समारंभ, पार्टी देण्यात आनंद वाटेल. सामाजिक कामाची आवड वाटेल. मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवाल. निरनिराळ्या वित्तीय संस्थातून गुंतवणूक करून धनी व्हाल.
25 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. नेपच्यूनमुळे स्वभाव फार महत्त्वाकांक्षी राहील. इतरांच्या मनावर अधिराज्य गाजवावे वाटेल. राजकारणी लोकांना हा योग विशेष चांगला आहे. ललीतकलांवर प्रभुत्व गाजविण्यासाठी हा योग चांगला आहे. तत्वज्ञान आणि अध्यात्म याची ओढ वाटेल. उदार स्वभावामुळे इतरांच्या मदतीस धावून जाल. इतरांप्रमाणे पैशाचे आकर्षण नाही तरी इतरांना मदत करता यावी म्हणून तो मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न कराल.
26 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, हर्षल, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. ग्रहांची चौकट अशी राहील की, त्यामुळे आयुष्यात अनेक प्रकारचे विरोधाभास निर्माण होतील. या स्वभावामुळे संपर्कात येणार्या व्यक्ती तुमच्याशी कसे वागावे याबाबतीत बुचकळ्यात पडतील. स्वभाव वरून कडक वाटला तरी, हृदयात करूणा राहील. मदत केलेले लोकही विरोधात उभे राहतील. इच्छाशक्ती प्रबळ आहे. एकदा घेतलेले निर्णय परत बदलत नाही. पैशाच्या उलाढालीत अत्यंत सावध रहाणे आवश्यक आहे. लबाडांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.
27 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, हर्षल, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. मंगळाच्या प्रभावामुळे स्वभावातील दोन गोष्टी इतरांना खटकतील. उतावळेपणा व स्पष्टवक्तेपणा यामुळे शत्रुंची संख्या मोठी राहील. न्यायशीलता चांगली आहे. इतरांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध लढा पुकाराल. स्वतंत्र बाण्याचे असल्यामुळे दुसर्याच्या हाताखाली किंवा निर्देशनाप्रमाणे व प्रमुख म्हणून काम केल्यास जीवनात चांगले यश मिळेल. 36 व्या वर्षानंतर शेअर्स व बिझनेस कंपन्याद्वारे भरपूर पैसा मिळेल.
28 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि,हर्षल, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. घेतलेले निर्णय त्वरीत कृतीत रूपांतरीत करतात. उद्योगशीलता चांगली आहे. चेहर्यावर कायम प्रसन्नता झळकत राहील. शासन विभाग, सामाजिक संस्था, वित्तीय, महापालिका यापैकी कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळेल. ग्रहांची चौकट आर्थिक बाबतीत फार चांगली आहे. आयुष्याच्या सुरूवातीला काही अडचणी आल्या तरी नंतर आर्थिक स्थिती उत्तम राहील.
29 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या चंद्र, नेपच्यून, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. ग्रहांची चौकट बौद्धिक उन्नतीसाठी चांगली आहे. बौध्दिक सामर्थ्याने लोकांच्या मनात आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण कराल. कोणत्याही क्षेत्रात करिअर स्वीकारले तरी त्यात बुद्धीच्या जोरात उत्तम प्रगती कराल. मुत्सद्दीपणाच्या जोरावर व्यवस्थापनच्या क्षेत्रात फार पुढे जाऊ शकाल. विरोधकालाही मदत करण्याची वृत्ती राहील. आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल. भाग्याने स्वतःहून पैसा चालत येईल.
30 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरू, हर्षल ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास कन्या आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. साध्या यशाने मनाचे समाधान होणार नाही. इतरांपेक्षा भव्य दिव्य करून दाखवावे अशी मनाला टोचणी राहील. आदर्शवादी स्वभावामुळे अनेक मित्र लाभतील. प्रेमप्रकरणाच्या बाबतीत अपयशी असाल. सामाजिक संस्था, प्रशासन, नगरपालिका यात राहून जनतेशी वारंवार संपर्क येईल. अचूक निर्णय घेऊन केलेल्या गुंतवणुकीमुळे मिळणार्या फायद्यातून आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे.