धुळे । Dhule प्रतिनिधी
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, (Department of Higher and Technical Education) ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य (Directorate of Libraries, State of Maharashtra, Mumbai ), मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय (District Library Officer) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथभवन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे 24 व 25 नोव्हेंबर रोजी धुळे ग्रंथोत्सव-2022 (Dhule Granthotsav-2022)चे अयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ग्रंथोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
थंडीचा कडाका; शेकोटी भोवती रंगताहेत राजकारणातील चढाओढीच्या चर्चा
धुळे ग्रंथोत्सवाची सुरवात 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. ही ग्रंथदिंडी जयहिंद महाविद्यालय ते जिल्हा ग्रंथालय आधिकारी कार्यालय, धुळे या मार्गावरुन काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीची सुरवात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिाकरी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, ज्येष्ठ शाहीर लोक कलावंत श्रावण वाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अवघ्या 24 तासात अपहृत तरुणाचा शोध
ग्रंथोत्सावाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री, धुळे जिल्हा गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अश्विनी पवार या राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून महापौर प्रदीप कर्पे, तर या कार्यक्रमास खासदार डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ हीनाताई गावीत, आमदार सर्व श्री. अमरीशभाई पटेल, डॉ. सुधीर तांबे, किशोर दराडे, जयकुमार रावल, काशिराम पावरा, कुणाल पाटील, डॉ. फारुख शाह, श्रीमती मंजुळाताई गावीत, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिाकरी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, ग्रंथालय संचालक द. आ. क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहील. तर माजी आ. अनिल गोटे, प्रा. शरद पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ, रमेश बोरसे, धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत.
बनावट कागदपत्रांद्वारे मिळविला छत्रपती क्रीडा पुरस्कारडीपीडीसीच्या सभेत… आ.खडसेंचा ‘अभिमन्यू’
या ग्रंथात्सोवात दुपारी 1 ते 2.30 या वेळेत ग्रंथ चळवळीतील बदलते प्रवाह या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी एल. जे. सोनवणे हे राहणार असून डॉ. नरेंद्र खैरनार, रमेश दाणे यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता बाल कवी संमेलन होणार असून दुपारी 3.30 ते 5 दरम्यान लेखक घडतांना या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कृष्णा पोतदार हे राहणार असून डॉ. सदाशिव सूर्यवंशी, डॉ. संजीव गिरासे यांचा सहभाग घेतील.
मंत्री गिरीश महाजनांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन VISUAL STORY: होय….मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय…..
तर ग्रंथोत्सावाच्या दुसर्या दिवशी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 ते 11.00 कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष अहिरे हे राहणार असून मोहनदास भामरे, राजेश खलाणे, श्रीमती योगीता पाटील यांचा सहभाग राहणार आहे. सकाळी 11 ते 2 या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तर दुपारी 3 ते 5 दरम्यान बहुभाषिक कवीसंमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी जगदीश देवपुरकर हे राहतील. तर रमेश जैन, संजय धनगव्हाळ, रमेश राठोड, जयराम मोरे, कमलेश शिंदे, शाहीर श्रावण वाणी, शाहीर गंभीर बोरसे, मतीन अन्वर, दत्तात्रय कल्याणकर, आप्पा खताळ, विरेंद्र बेडसे, बाळकृष्ण शिंदे, प्रवीण पवार, रावसाहेब कुवर, श्रीमती प्रतिभा श्रीवास्तव, गुलाब मोरे हे सहभागी होणार आहे.
VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट
धुळे ग्रंथोत्सवाचा समारोप दुपारी 5 ते 5.30 दरम्यान होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जलज शर्मा हे राहतील. तर ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती रत्नाबाई पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती ममता हटकर, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मोहन देसले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची प्रमुख उपास्थिती राहणार आहे. या ग्रंथोत्सवास जिल्ह्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा, सदस्य मोहन देसले, विलास बोडके, डॉ. श्रीमती शशिकला पवार, डॉ दत्ता परदेशी, डॉ. सदाशिव सुर्यवंशी, प्रकाश पाटील, सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे.