Wednesday, October 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजटायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शस्त्रपुरवठ्याची साखळी उघड; ‘डेड लेटर बॉक्स’चा वापर, काय...

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शस्त्रपुरवठ्याची साखळी उघड; ‘डेड लेटर बॉक्स’चा वापर, काय आहे नेमकं डेड लेटर बॉक्स?

मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारानंतर अख्खं बॉलिवूड हादरले आहे. रविवारी (18 ऑक्टोबर) सायंकाळी 7 वाजता घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी आपली चक्रे वेगाने फिरवली आणि त्यानंतर राजस्थान पोलिसांनी या घटनेतील तीन हल्लेखोरांना कोटा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. त्यानंतर हे तिन्ही आरोपी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आली. सध्या या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे आता समोर येऊ लागले आहे,

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या तपासात शस्त्रपुरवठ्याच्या कथित साखळीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, हल्ल्यात वापरलेले शस्त्र अमृतसरमधून मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘डेड लेटर बॉक्स’ पद्धतीचा वापर करण्यात आला. या प्रकरणात कुणाल आणि सुमित या दोघांनी शस्त्रे मिळवण्याची जबाबदारी घेतल्याचा संशय असून, राधा आणि बबिता या दोन तरुणींनी ती मुंबईत पोहोचवण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. आता पोलीस चौकशीतून या प्रकरणात शस्त्रपुरवठ्याच्या सिंडिकेटचा खुलासा झाला आहे. प्रकरणातील आरोपींना ‘डेड लेटर बॉक्स’ पद्धतीनं शस्त्रांचा पुरवठा करण्यात आल्याचं समोर आलंय.

- Advertisement -

अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलेले असतानाच आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या NDR युनिटनं 20 ऑक्टोबर रोजी 4 जणांना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. अटक आरोपींमध्ये हरियाणातील 21 वर्षीय कुणाल आणि 19 वर्षीय सुमित यांचा समावेश आहे. तर, उत्तर प्रदेशातील 23 वर्षीय राधा आणि बाबिता या दोन तरुणींना सुद्धा अटक करण्यात आली आहे. आरोपींना BNSS कलम 35(1)(b) अंतर्गत कोर्टात हजर करण्यात आले आहे.

पडसाद : धर्म, अहंकार आणि सिंहस्थ

आरोपींनी शस्त्र कुठून आणि कशी मुंबईपर्यंत आणली?
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात आरोपींना पिस्तूल कुठून आणि कसे मिळाले? याचा खळबळजनक खुलासा पोलीस चौकशीत झालाय. एका अज्ञात व्यक्तीनं अमृतसरमध्ये शस्त्र ठेवलेली. अनिल पंडितनं ही शस्त्र ठेवलेलं लोकेशन कुणाल आणि सुमितला पाठवलं होतं. दोन आठवड्यांपूर्वी कुणाल आणि सुमित यांनी अमृतसरला जाऊन शस्त्र ताब्यात घेतली. त्यानंतर ती शस्त्र मुंबईला पोहोचवण्यासाठी दोन तरुणींची मदत घेतली. शस्त्रं मुंबईत पोहोचवण्यासाठी राधा आणि बबिताचा वापर केला. त्यांना दिल्लीहून मुंबईला ट्रेननं पाठवलं आणि राधाच्या बॅगमध्ये पिस्तूल ठेवलं.

तपासातील माहितीनुसार, अनिल पंडित याने कुणाल आणि सुमितला या कामासाठी सुमारे ७० ते ८० हजार रुपये दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यातील १० ते १२ हजार रुपये राधा आणि बबिता यांना शस्त्रवाहतुकीच्या कामासाठी देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. या आर्थिक व्यवहारांमुळे हल्ल्याच्या कटामागील कथित सिंडिकेट आणि पैशांची देवाणघेवाण तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.

डेड लेटर बॉक्स म्हणजे काय?
या प्रकरणात चर्चेत आलेली ‘डेड लेटर बॉक्स’ ही संकल्पना गुप्तपणे वस्तूंची देवाणघेवाण करण्याच्या पद्धतीसाठी वापरली जाते. या प्रकारात एक व्यक्ती एखाद्या ठिकाणी वस्तू ठेवते आणि दुसरी व्यक्ती ती वस्तू तेथून घेऊन जाते. दोघांची प्रत्यक्ष भेट होत नसल्याने देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींची ओळख एकमेकांपासून लपवता येऊ शकते.

पोलिसांच्या तपासानुसार, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील शस्त्रेही अशाच पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली असावीत. शस्त्रे नेमकी कोणी ठेवली होती, याची माहिती कुणाल आणि सुमित यांना नव्हती, असा तपासातील दावा आहे. शस्त्रे असलेल्या ठिकाणाची माहिती अनिल पंडित याने एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲपद्वारे पाठवला असण्याची शक्यता आहे.

अमृतसर ते मुंबई शस्राचा प्रवास
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कुणाल आणि सुमित हे गोळीबाराच्या घटनेच्या सुमारे दोन आठवडे आधी अमृतसरला गेले होते. तेथून त्यांनी एक पिस्तूल आणि २० काडतुसे मिळवल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यानंतर हे शस्त्र मुंबईत पोहोचवण्यासाठी पुढील व्यवस्था करण्यात आली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या कथित साखळीत वेगवेगळ्या व्यक्तींना स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. शस्त्र मिळवणे, ते दुसऱ्या शहरात पोहोचवणे आणि हल्ल्यानंतर आरोपींच्या हालचालींसाठी मदत करणे अशा कामांचे धागेदोरे तपासात समोर येत आहेत.

या प्रकरणातील मुख्य प्रश्न म्हणजे शस्त्रपुरवठ्याच्या संपूर्ण साखळीमागे आणखी कोण होते आणि या हल्ल्यासाठी शस्त्रे कोणी उपलब्ध करून दिली. याचा तपास दिल्ली आणि मुंबई पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या