नवी दिल्ली | New Delhi –
- Advertisement -
चीनी अॅप टिकटॉकवर भारत आणि अमेरिकेने बंदी घातली आहे. TikTok आता टिकटॉकने आपले अॅप खरेदी करण्याबाबत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला साकडे घातले आहे. Reliance Industries Limited
दरम्यान अमेरिकेचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठा उद्योगसमूह मायक्रोसॉफ्टने टिकटॉक खरेदी करणार असल्याची चर्चा होती. परंतु, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंदी आदेश जारी करताच टिकटॉकने आता रिलायन्सवर जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे.
सदर अॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर यांनी रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेतली आहे. दोन्ही समूहाचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत मात्र रिलायन्स टिकटॉक खरेदी करणार असल्याची अफवा असल्याचे रिलायन्सच्या अधिकार्यांनी म्हटले आहे.