Monday, June 17, 2024
Homeनगरटिळकनगरला गतिरोधकामुळे अपघाताचे सत्र सुरूच

टिळकनगरला गतिरोधकामुळे अपघाताचे सत्र सुरूच

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर- एकलहरे रस्त्यांवरील महादेव मंदिरासमोर असलेल्या गतिरोधकावर पांढरपट्टे नसल्याने रोज अपघात होत आहे. काल सकाळी वाकडी येथील शेतकरी दुचाकीवरून आपल्या पत्नीसह या रस्त्यावरून उक्कलगाव येथे जात असताना गतिरोधकावरून पडले. यात महिला गंभीर जखमी झाली असून तोंडाला, हाताला व पायाला जबर मार लागला आहे.

या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. तसेच दुचाकीस्वारांची संख्या खूप आहे. दुचाकीस्वरांना गतिरोधक दिसत नसल्यामुळे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. गतिरोधकामुळे आतापर्यंत 1 जणांचा मृत्यू झाला असून शेकडोच्यावर दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. श्रीरामपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याकडे लक्ष घालून सदर गतिरोधकावर कायमस्वरूपी पांढरे पट्टे मारण्यात यावेत किंवा दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते भैय्या पांडे यांच्यासह वाहनचालक व ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या