Sunday, May 26, 2024
Homeनगरसासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर|Ahmedagar

सासरच्या छळाला कंटाळून (Tired of his father-in-law’s persecution) विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या (married Women Suicide) केली. कोमल रमेश जाधव (वय 26 रा. शिंगवे नाईक ता. नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. कोमलला आत्महत्येस प्रवृत करणार्‍या पती, सासू व सासर्‍याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये (MIDC Police Station) गुन्हा दाखल (Filed a crime) केला आहे. कोमलचे वडिल सोपान नानाभाऊ भोगे (वय 47 रा. खरवंडी ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल झाल्यामध्ये कोमलचा पती रमेश बाळासाहेब जाधव, सासरा बाळासाहेब भोगाजी जाधव व सासू सुनीता बाळासाहेब जाधव (तिघे रा. शिंगवे नाईक) यांचा समावेश आहे. पोलिसांनी रमेश जाधव याला अटक (Arrested) केली आहे. नेवासा (Newasa) तालुक्यातील खरवंडी (Kharwandi) येथील कोमल भोगे हिचा विवाह जानेवारी 2020 मध्ये नगर तालुक्यातील शिंगवे नाईक (Shigve Naik) येथील रमेश जाधव सोबत झाला होता. कोमल सासरी नांदत असताना सुमारे दीड वर्षापूर्वी जमीन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये (Five lakh rupees Demand) आणावेत म्हणून तिचा छळ सुरू होता.

तसेच कार घेण्यासाठी पाच लाख रूपये आणावे यासाठी कोमलचा पती, सासू-सासर्‍याकडून शिवीगाळ, मारहाण करून छळ केला जात होता. यामुळेच कोमलने 8 ऑगस्टला रात्री विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या