नाशिक | प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात दिवसभरात ४५ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात २५ रुग्णांनी करोनावर मात केली.
- Advertisement -
जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील २१ रुग्ण , नाशिक ग्रामीण क्षेत्रातील २३ रुग्ण तर, मालेगाव मनपा क्षेत्रातील १ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही . (Death of Corona Patient). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ९०४ इतकी आहे.