Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात दिवसभरात ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दिवसभरात ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ४९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ४३ रुग्णांनी करोनावर मात केली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ४९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील २६ रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील १९ रुग्ण, मालेगाव मनपा क्षेत्रातील २ रुग्ण तर, जिल्हाबाह्य २ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या