Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे –

पुणे शहरात आज 247 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. एकूण करोनाबाधितांची संख्या 1 लाख 73 हजार 402 इतकी संख्या झाली आहे.

- Advertisement -

आज आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून 4 हजार 530 मृतांची संख्या झाली. आज 228 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर 1 लाख 63 हजार 779 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 162 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 292 जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 94 हजार 88 वर पोहचली असून पैकी, 90 हजार 765 जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 803 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या