Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे रुग्ण

मुंबई –

महाराष्ट्रात करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. याचबरोबर, करोनावर मात करणार्‍यांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात आज

- Advertisement -

दिवसभरात 13 हजार 714 जणांनी करोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 85.4 टक्क्यांवर पोहचला आहे. तर, आज राज्यात 10 हजार 226 नवे करोनाबाधित आढळले असून, 337 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 15 लाख 64 हजार 615 वर पोहचली आहे.

राज्यातील एकूण 15 लाख 64 हजार 615 करोनाबाधितांमध्ये 1 लाख 92 हजार 459 अ‍ॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले 13 लाख 30 हजार 483 जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 41 हजार 196 जणांच्या संख्येचा समावेश आहे. सद्यस्थितीस राज्यात 23 लाख 27 हजार 493 जण गृहविलगीकरणात आहेत. तर, 23 हजार 183 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासणी झालेल्या 79 लाख 14 हजार 651 नमून्यांपैकी 15 लाख 64 हजार 615 नमूने (19.71 टक्के) करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या