Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाची आज अंतिम महासभा

मनपाची आज अंतिम महासभा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका निवडणूक ( NMC Elections ) वेळेत होत नसल्याने नाशिक पालिकेत 15 मार्चपासून प्रशासकराज ( Administrative Rule )येणार आहे. आयुक्त कैलास जाधव ( NMC Commissioner Kailas Jadhav ) यांच्यावर प्रशासक म्हणून काम पाहण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आलेले आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आज ( दि. 10) गुरुवारी सकाळी 11.30 वाजता ऑनलाइन पद्धतीने महापौर सतीश कुलकर्णी ( Mayor Satish Kulkarni )यांच्या अध्यक्षतेखाली महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान चालू पंचवार्षिकची ही अंतिम महासभा ठरणार आहे. या मध्ये कोणकोणते विषय चर्चेला येतात याकडे लक्ष लागले आहे.

ओबीसी आरक्षण वरून नवीन पेचप्रसंग निर्माण झाले आहे. राज्य शासनाने याबाबत वेगळी भूमिका घेतल्याने निवडणूक आणखी लांबण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. विधानसभेत ओबीसीं शिवाय निवडणूक घेणार नसल्याचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात होणार्या निवडणुका पाच ते सहा महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यातच नाशिक पालिकेची 14 मार्चपर्यंत मुदत संपुष्टात येणार आहे.

त्यानुसार त्यानुसार 15 मार्चपासून आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज पाहतील. यापुर्वी महापालिकेची महासभा 17 फेब्रुवारीला ऑनलाइन बोलविण्यात आली होती. मात्र भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या निधन झाल्यामुळे ही महासभा तहकूब करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आली होती. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी जादा विषय मंजूर करून महासभा तहकूब केली होती, तहकूब केलेली महासभा व नियमित महासभा आज सकाळी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या