Tuesday, December 10, 2024
Homeभविष्यवेधआजचे राशी भविष्य 24 डिसेंबर 2023 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 24 डिसेंबर 2023 Today’s Horoscope

मेष –

कौटुंबिक अडचणी व स्थावर मालमत्तेचे प्रश्न मिटतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. रवि-चंद्र शुभ योग उद्योग-व्यवसायासाठी फलदायी ठरेल. व्यापारातील बदल फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. मत्सर वा कोणाचाही द्वेष करू नका.

- Advertisement -

वृषभ –

कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. मुलांशी सुंसवाद राहील. चंद्राचा शुक्र आणि मंगळाशी योग प्रगतीचे मार्ग मोकळे करेल. नवीन गृहपयोगी वस्तू खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. मित्रमंडळी व भावंडांची साथ मिळेल.

मिथुन –

दिवस आत्मविश्वासानं भरलेला राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. चंद्रबळ उत्तम असल्यानं व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. प्रयत्नांनुसार फळ मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम करून दाखवाल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. सहकार्‍यांसोबतचे वाढविवाद टाळा.

कर्क –

चंद्र गोचर आज शुभ स्थानातून होत आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार लाभदायी ठरेल. मनाप्रमाणे काम होईल. मित्रांसोबतचे वाद मिटतील. जबाबदार्‍या ओळखून पूर्ण कराल. आहारावर नियंत्रण ठेवा. फाजिल आत्मविश्वास बाळगू नका. दूरचा प्रवास लाभदायक ठरेल. तीर्थयात्रेचा योग आहे.

सिंह –

रवि-मंगळ युतीत नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तूंचा लाभ होईल. रखडलेली उधारी मिळेल. नातलगांची साथ लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्माची ओढ लागेल. कामावर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षित लाभ होतील.

कन्या –

भागीदारासोबत वाद-विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. व्यवहार करताना सावध राहा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. संयम राखा. मित्रांची व भागीदाराची मदत घ्यावी लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक टाळा.

तुला –

प्रयत्न सफलदायक ठरतील. विद्यार्थ्यांची अपेक्षित प्रगती होईल. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत मनाप्रमाणे बदल होतील. प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ ठराल. रखडलेली कामं पूर्ण होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक लाभदायक ठरेल. कुटुंबातील वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल.

वृश्चिक –

चंद्र गोचरात व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागेल. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचनाची गोडी वाढेल. मन समाधानी राहील. नोकरीत कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल. वरिष्ठांशी विसंवादाची शक्यता आहे. प्रवास जपून करा. हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद संभवतात.

धनु –

साहित्याच्या क्षेत्रातील लोकांना आर्थिक लाभ व प्रतिष्ठा मिळेल. शुभवार्ता कानी पडेल. वैवाहिक सुख लाभेल. मुलांकडून समाधान मिळेल. आत्मविश्वास दुणावेल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल.

मकर –

नातेवाईकांशी कटुता येण्याची शक्यता आहे. कामाच्या दृष्टीकोनातून दिवस कष्टदायक असेल. मानसिक त्रास जाणवेल. कुटुंबातून म्हणावी तशी साथ मिळणार नाही. उद्योग-व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. आर्थिक उत्पन्नात अडथळे निर्माण होतील. आरोग्याकडं लक्ष द्या. शेअर बाजारातील गुंतवणूक टाळा.

कुंभ –

ग्रहमान चांगलं आहे. पती-पत्नीमधील संंबध चांगले राहतील. कर्तृत्वाला साजेसे कार्य कराल. मान्यवरांच्या सहवासामुळं प्रतिष्ठा वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. धनलाभाचा योग आहे. भांवडाची साथ मिळेल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. कुटुंबासोबत दूरच्या प्रवासाचं नियोजन कराल.

मीन –

मानसिक आरोग्याकडं लक्ष द्या. नैराश्याचा सामना करावा लागेल. मोठी गुंतवणूक करणं टाळा. अंहकारामुळं मित्र दुरावण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडं दुर्लक्ष होऊ शकतं. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावू शकते. प्रकृती अस्थिर राहिल. नवीन कार्य सुरू करणं टाळा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या