Wednesday, May 29, 2024
HomeनाशिकNashik : टोमॅटोने शेतकऱ्यांना बनवले कोट्याधीश; जिल्ह्यात लावलेल्या बॅनरची होतेय सर्वत्र चर्चा

Nashik : टोमॅटोने शेतकऱ्यांना बनवले कोट्याधीश; जिल्ह्यात लावलेल्या बॅनरची होतेय सर्वत्र चर्चा

नाशिक | Nashik

गेल्या महिनाभरापासून टोमॅटोच्या (Tomato) वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मात्र, याच टोमॅटोने काही शेतकऱ्यांना (Farmers) मालामाल केले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) शेतकऱ्यांचा देखील समावेश असून सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) धुळवड गावातील शेतकऱ्यांना टोमॅटोपासून करोडो रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने त्यांनी चक्क अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. त्यांच्या या बॅनरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे…

- Advertisement -

Sharad Pawar : शरद पवार ‘या’ तारखेपासून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळवड गावात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग असून यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड (Cultivation) केली होती. यातील जवळपास १५ शेतकरी ‘करोडपती’ तर ५५ शेतकऱ्यांना ५० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तर इतर छोटे शेतकरी देखील ‘लखपती’ झाले असून दिवसेंदिवस या आकडेवारीत भर पडतांना दिसत आहे. त्यामुळे येथील शेतकरी लॉटरी लागल्याप्रमाणे आनंदोत्सव साजरा करत आहेत.

NCP Crisis : शरद पवारांची साथ का सोडली? धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

या आनंदातून धुळवड गावातील (Dhulwad Village) सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी बॅनर लावला असून हा बॅनर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या बॅनरवरील ‘होय आम्ही करोडपती-लखपती धुळवडकर’ अशा आशयाचा मजकूर देखील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आतापर्यंत आपण राजकीय पुढार्‍यांच्या वाढदिवसाचे तसेच विविध उपक्रमांचे बॅनर बघत असतो. मात्र, आता धुळवडकरांच्या या यशाचे बॅनर पहिल्यांदा लागल्याने संपूर्ण जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

महाराष्ट्रात पावसाची उघडीप? नाशिक, नगरला अद्यापही प्रतीक्षाच

दरम्यान, कवडीमोल भावात विकला जाणारा टोमॅटो सुरुवातीला ५० रुपये प्रति जाळीने (कॅरेट) विकला गेला. आता सध्या किरकोळ बाजारात टोमॅटो प्रतिकिलो सुमारे १५० ते २०० रुपये दराने (Rate) मिळत आहे. तर २० किलो वजनाच्या एका जाळीला (कॅरेट) सुमारे २००० ते २१०० रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना एकरी १० ते १२ आणि काहींना ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या