Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमविआचा उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मविआचा उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

- Advertisement -

महाविकास आघाडीने शनिवारी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर शहरातील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ बंदची हाक महाविकास आघाडी कडून करण्यात आली आहे. या महाराष्ट्र बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.

त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. यावर आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केली आहे. शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाने पुकारलेला बंद हा बेकायदेशीर आहे असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तरी ही कोणी बंद पुकारत असेल तर विरोधात कायदेशीर कारवाई करावी असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे उद्याच्या मविआच्या बंदचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बंद करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा बंदला मनाई करावी अशी मागणी करणारी याचिका सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने कोणत्याही पक्षाला बंद करता येणार नाही. बंद केल्यास त्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी असा आदेश सरकारला दिला आहे.

 

- Advertisment -

ताज्या बातम्या