Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशकोरोनाची चिंताजनक बातमी : देशातील टॉप १० मध्ये नाशिक, जळगाव

कोरोनाची चिंताजनक बातमी : देशातील टॉप १० मध्ये नाशिक, जळगाव

नवी दिल्ली

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे. देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांमध्ये नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यात नाशिक व जळगावचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील ३६ पैकी ९ म्हणजे जवळपास एक चतुर्थांश भाग कोरोनाने व्यापला आहे. केंद्र सरकारने देशातील अशा दहा जिल्ह्यांची यादी जारी केली आहे, जिथे कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणे आहेत. यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जिल्हे आहेत. दहापैकी नऊ जिल्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच आहेत तर कर्नाटकातील फक्त एका जिल्ह्याचा समावेश आहे.

ही आहेत १० जिल्हे

नाशिक

जळगाव

पुणे

नागपूर

मुंबई

ठाणे

औरंगाबाद

नांदेड

अकोला

बंगळुरू शहर (कर्नाटक)

- Advertisment -

ताज्या बातम्या