Friday, May 3, 2024
Homeजळगावलग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आला. तरुणी गर्भवती झाल्यानतंर धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी (chalisgaon) चाळीसगाव ग्रामीण (police) पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फुस लावून पळवून नेले. तब्बल साडे सहा महिने शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. यातून ती मुलगी गर्भवती झाल्याचे गंभीर प्रकार २१ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आला आहे. भगवान (रा. चांभार्डी बु. ता. चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पोस्को अंतर्गत ४, ६, ८, १२ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या