Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political: समीर भुजबळांचा दौरा; कांद्याला दुप्पट भाव

Nashik Political: समीर भुजबळांचा दौरा; कांद्याला दुप्पट भाव

मंगळणेतील शेतकर्‍याच्या चेहर्‍यावर हास्य

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव बाजार समितीत एक आश्चर्यजनक प्रकार घडला. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारदौर्‍यामुळे मंगळणे येथील शेतकर्‍याच्या कांद्याला दुप्पट भाव मिळाला. निराश झालेला शेतकरी गावी हताशपणे परतण्याच्या मन:स्थितीत होता. मात्र प्रचार दौर्‍यामुळे त्याच्या कांद्याला उत्तम दर मिळाल्याने तो खूश होऊन गावी परतला. या शेतकर्‍याने समीर भुजबळ यांचे आभार मानले. आपण भुजबळ यांनाच मत देणार आहोत. शेतकरी बांधवांनी भुजबळ यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन या शेतकर्‍याने केले आहे.

- Advertisement -

मंगळणे येथील शेतकरी रमेश पवार यांनी नांदगाव बाजार समितीत कांदा विक्रीस आणला. मात्र या कांद्याला अवघा एक हजार रुपये क्विंटल असा भाव देण्यात आला. चांगल्या दर्जाचा कांदा असूनही भाव मिळत नसल्याबद्दल या शेतकर्‍याने समितीच्या सचिवांकडे तक्रारही केली. त्याचा फायदा न झाल्याने अखेर पवार कांदा परत नेण्याच्या मन:स्थितीत होते. त्यावेळी समिती आवारात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचा प्रचार दौरा आला. पवार यांनी आपबिती भुजबळ यांच्याकडे कथन केली. त्यानंतर भुजबळ यांनी कांद्याची पाहणी केली. कांदा चांगला असूनही भाव का मिळत नाही? अशी विचारणा भुजबळ यांनी बाजार समिती सचिव अमोल खैरनार यांच्याकडे केली. त्यानंतर या कांद्याचा दुबार लिलाव करण्यात आला. त्यावेळी या कांद्याला 2,201 रुपये क्विंटल भाव जाहीर करण्यात आला. भुजबळ यांच्यामुळेच आपल्या कांद्याला दुप्पट भाव मिळाल्याचे सांगत हा शेतकरी आनंदला. त्याच्या चेहर्‍यावर हसू फुलले.

YouTube video player

समीर भुजबळ यांच्यामुळे आज माझ्या कांद्याला दुप्पट दर मिळाला. मी अत्यंत समाधानी आहे. भुजबळ यांनी माझी आत्मीयतेने चौकशी केली. बाजार समितीच्या कारभाराची दखलही घेतली. त्यांचे मनापासून आभार..
-रमेश पवार,
कांदा उत्पादक शेतकरी, मंगळणे

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...