Thursday, January 8, 2026
Homeनगरट्रॅक्टरखाली दबल्याने तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टरखाली दबल्याने तरुणाचा मृत्यू

कोळपेवाडी |प्रतिनिधी| Kolpewadi

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील धारणगाव येथील बबलू शहा या तरुणाचा धारणगावमध्ये अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरखाली दाबून जागीच मृत्यू (Youth Death) झाल्याची घटना घडली. कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला (Kopargav Rural Police Station) अकस्मात मृत्यूच्या गुन्हाची नोंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

रविवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास धारणगाव गोदावरी नदीपात्रातून फरांडीच्या साह्याने उपसा केलेली वाळू ट्रॅक्टर डंपिंग ट्रालीद्वारे वाहतूक करण्यासाठी गेलेल्या बबलु शहा या युवकाचा ट्रॅक्टरखाली दाबून मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत मोठा आक्रोश करत अपघात झालेले वाहन घटनास्थळावर रोखून धरल्याची माहिती समोर येत आहे.

YouTube video player

वाळू उपसा केलेल्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे असल्याने मजुरांनी ट्रालीमधून खाली उतरणे पसंत केल्याने त्यांचा जिव वाचल्याची चर्चा नागरिक करत होते. तालुक्यातील कुंभारी-धारणगाव गोदावरी नदी पात्रात (Godavari River) हिंगणीच्या कोल्हापूर टाईप बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून बॅक वाटरचे पाणी माहेगावच्या बंधार्‍यापर्यंत लागलेले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....