Sunday, October 18, 2026
HomeनगरAccident News : ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात; ट्रॅक्टर चालकाचा जागीच ठार

Accident News : ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात; ट्रॅक्टर चालकाचा जागीच ठार

वडाळा महादेव |वार्ताहर| Wadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील गायकवाड निंबोणी मळा परिसरात काल सायंकाळी साडेपाचवाजेच्या दरम्यान झालेल्या ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात (Accident) ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रोहित अशोक आहिरे (वय 30, रा. नाऊर) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

- Advertisement -

रोहित आहिरे हे आज सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान हरेगाव मार्गे आपला ट्रॅक्टर ट्रॉलीसह भरधाव वेगाने नाऊरच्या दिशेने घेवून जात असताना, वडाळा महादेव शिवारातील निंबोणी मळा परिसरात आहिरे यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणार्‍या दुचाकीला टॅ्रक्टरने जोराची धडक दिली. त्यानंतर ट्रॅक्टर खड्ड्यामध्ये पलटी झाला. त्यामुळे रोहित आहेरी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार जखमी झाला.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी वडाळा महादेव येथील सरपंच सचिन पवार व पोलिसांना घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच सरपंच सचिन पवार यांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने ट्रॅक्टर खाली दबलेल्या आहिरे यांना बाहेर काढत रुग्णवाहिकेतून वैद्यकीय उपचारासाठी श्रीरामपूर साखर कामगार रुग्णालय हलविले. परंतू त्यापूर्वीच ते मयत झाले होते. जखमी दुचाकीस्वारावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...