Thursday, May 23, 2024
Homeनगरट्रॅक्टरच्या धडकेत 2 ठार 1 जखमी

ट्रॅक्टरच्या धडकेत 2 ठार 1 जखमी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

भरधाव ट्रॅक्टरच्या (Tractor) धडकेतील दुचाकीवरील (Bike) दोघे जागीच ठार (Death) झाले तर एकजण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. जखमीला शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे.

- Advertisement -

लालसिंग गहू डावर (वय 35) व दिलीप छगन जाधव (वय 23) अशी अपघातात (Accident) ठार झालेल्यांची नावे आहेत. रायमल जामसिंग तरोळे (रा. दोनवाडा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, ह. मु. नाटेगाव, ता. कोपरगाव) असे जखमी (Injured) इसमाचे नाव आहे.

तलवार व कोयत्याने वार करुन युवकाची केली हत्या

ब्राह्मणगाव (Brahmangav) येथील गुरुवारचा आठवडी बाजार करून लालसिंग डावर, दिलीप जाधव व रायमल तरोळे हे तिघे एमएच 17 बीसी 5025 क्रमांकाच्या दुचाकीवरून नाटेगावकडे जात होते. यावेळी समोरून येणार्‍या ट्रॅक्टरने (Tractor) त्यांना जोरदार धडक (Hit) दिली. या अपघातात लालसिंग डावर व दिलीप जाधव हे जागीच ठार झाले, तर रायमल तरोळे गंभीर जखमी झाले. जखमी तरोळे यांना शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मोदींच्या सभेलाही मराठा आंदोलनाचा फटका

शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. याप्रकरणी रायमल तरोळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. आंधळे करीत आहेत.

जिल्ह्यातील 32 गावांत राजकीय नेत्यांना बंदी

- Advertisment -

ताज्या बातम्या