Tuesday, May 7, 2024
Homeजळगावकापूस भाव वाढीमुळे व्यापाऱ्यांची चांदी ; शेतकऱ्यांना होतोय पश्चाताप

कापूस भाव वाढीमुळे व्यापाऱ्यांची चांदी ; शेतकऱ्यांना होतोय पश्चाताप

मस्कावद, ता.रावेर – वार्ताहर raver

ज्यावेळेस (Farmers) शेतकऱ्यांचा कापूस (Cotton) शेतातून घरी आला त्यावेळेस मस्कावदसह परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उत्पादित कापूस साडेसहा हजारापासून ते साडेसात हजारापर्यंत प्रति क्विंटलचा भावात (Merchant) व्यापाऱ्यांना विकला. मात्र मागील आठवड्याभरापासून कापसाचे दर सातत्याने वाढत आहेत.

- Advertisement -

एका आठवड्यामध्ये कापसाचे दर साडेनऊ हजारावरून एकदम दहा हजार दोनशे रुपयांपर्यंत गेलेत. तर सध्या कापूस दहा हजार ४०० ते दहा हजार ५०० रुपये प्रति क्विंटलने विकला जाऊ लागलाय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यां पेक्षा व्यापारी वर्ग यांना हा आठवडा कमाईसाठी ऐतिहासिक ठरत आहे. शेतकऱ्यांनी मात्र अत्यल्प भावात आपला कापूस विकून मोकळे झाले. मात्र सध्याच्या भाववाढीमुळे शेतात कापूस पेरणारा ,कापसाला दररोज पाणी, तसेच फवारा व इतर मशागत करणारा शेतकऱ्यांना मात्रा ह्या भावापासून वंचित ठेवण्यात आले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कापसाला जवळजवळ ५० वर्षानंतर एवढा भाव मिळालाय. मात्र त्याचा फायदा बळीराजा ला न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात असंतोषाचे वातावरण दिसत आहे.

मागील वर्षाच्या तुलनेने ह्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसावरील बुरशीजन्य तसेच लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनात मोठी घट आलेली असताना अत्यल्प भावाने समाधान मानावे लागले. मात्र अचानक झालेल्या भाव वाढ मागे शेतकऱ्यांपेक्षा ज्या व्यापाऱ्यांनी, कापूस जिनिंग-प्रेसिंग करून कापसाची गठाण,बेल करून गोदामात माल भरुन ठेवलेला त्यांना पुढे अधिक लाभ मिळणार आहे.

तसेच २००० ते पंचवीसशे रुपयापर्यंत असलेले सरकी ४००० रुपयांपर्यंत गेल्याने पशुधनास लागणारे खाद्य म्हणजेच सरकी ढेपची किंमत गगनाला भिडल्याने पशुधन पालक हवालदिल झालेला दिसत आहे. हवालदिल झालेले आहे एकंदरीत ज्या शेतकऱ्यांनी श्रम घेतले व बहुतेक शेतकरीच पशुपालन व्यवसायात असल्याने स्वतः उत्पादित केलेला कापसाला सद्यस्थितीत सोन्याची चमक, सोन्याची झळाळी आलेली असल्याने कापसाची साठवणूक न केल्यामुळे पश्चाताप सहन करावा लागत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या