Thursday, February 5, 2026
Homeमहाराष्ट्रधोतराच्या पायघड्यांनी पालखीचं पारंपारिक पद्धतीने स्वागत, डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा

धोतराच्या पायघड्यांनी पालखीचं पारंपारिक पद्धतीने स्वागत, डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा

पुणे (प्रतिनिधी)

टाळ मृदंगाचा गजर… माउली तुकोबा नामाचा जयघोष… अशा वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मेंढय़ांचे गोल रिंगण काटेवाडी येथे शुक्रवारी उत्साहात पार पडले. या वेळी पारंपरिक पद्धतीने पालखीच्या स्वागतासाठी धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. हा सोहळा याचि देही याची डोळा साठवण्यासाठी नागरिकांसह वारकरऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

- Advertisement -

मागच्या शेकडो वर्षांपासून तुकोबांच्या पालखीच्या स्वागताची ही अनोखी परंपरा सुरू आहे. संत गाडगे महाराजांच्या प्रेरणेतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. त्यानुसार यंदाही काटेवाडी येथे पालखीचे अतिशय भक्तिभावात व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

YouTube video player

तुकोबांच्या पालखीचा गुरुवारी बारामतीत मुक्काम होता. सकाळी पालखी मार्गस्थ झाली आणि वारकऱ्यांना वेध लागले, ते काटेवाडीचे. काटेवाडी आणि वारकऱयांचे जीवाभावाचे नाते आहे. अशा या काटेवाडीत रंगला, तो डोळय़ांचे पारणे फेडणारा रिंगणसोहळा. सुरुवातीला तुकोबांच्या पालखीभोवती मेंढया धावल्या.

त्यांच्यापाठोपाठ पताकावाले, तुळशी वृंदावन आणि कलश डोक्मयावर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाजवाले आणि टाळकरी धावले. रिंगण पूर्ण होईपर्यंत अखंड तुकोबा आणि माउलींचा नामघोष सुरू होता. मुख्य मार्गापासून गावातील मैदानावर पालखी नेण्यात आली. येथे परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकऱयांनी अल्पोपहार केल्यानंतर सोहळा सणसर मुक्कामी विसावला.

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...