Friday, January 30, 2026
HomeनाशिकNashik News: ग्रेड सेप्रेटरसह अन्य कामांमुळे वाहतूक कोंडी; शहरातील वाहतुकीला वर्षभर 'ब्रेक'

Nashik News: ग्रेड सेप्रेटरसह अन्य कामांमुळे वाहतूक कोंडी; शहरातील वाहतुकीला वर्षभर ‘ब्रेक’

नाशिक | प्रतिनिधी
द्वारका चौकातील बहुप्रतिक्षित ग्रेड सेप्रेटरच्या कामास सुरुवात होत असतानाच, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील तब्बल ३० रस्ते व ४ उड्डाणपुलांची कामे एकाच वेळी हाती घेण्यात येणार आहेत. परिणामी, पुढील किमान एक वर्ष नाशिक शहरात वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः जड व अवजड वाहनांना शहराबाहेर रोखण्याची कोणतेही उपाय व यंत्रणा नसल्याने ही वाहने रहिवासी भागातूनच मार्गक्रमण करणार असून, अपघातांचा धोका वाढणार आहे. नाशिककरांना येत्या काळात अक्षरशः ‘जीव मुठीत धरून’ प्रवास करावा लागण्याची चिन्हे आहेत.

द्वारका चौकात येणाऱ्या सर्व जड वाहने, एसटी व सिटी लिंक बसेसना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांसाठी फेम थिएटर, वडाळागाव, कलानगर, पाथर्डी फाटा, लेखानगर, मुंबईनाका, तसेच साईनाथनगर चौफुली इंदिरानगर, अंडरपास असे पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

- Advertisement -

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय; झेडपी निवडणुकांसाठी उमेदवारांना दिले महत्वाचे आदेश

YouTube video player

मात्र, या मार्गावर आधीच वाहनांचा मोठा ताण असून, सकाळ संध्याकाळी कोडी अटळ ठरणार आहे. श्री श्री रवीशंकर मार्ग, कलानगर, साईनाथनगर चौफुली ते मुंबईनाका या परिसरात शाळांची संख्या मोठी आहे. शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत हजारो विद्यार्थी व पालकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी जड वाहतूक वळविल्यास विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनणार आहे. काही वर्षांपूर्वी याच मार्गावर जड वाहतुकीमुळे सातत्याने अपघात घडले होते. नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर हा मार्ग जड वाहनांसाठी बंद करण्यात आला.

अवजड वाहनांना पर्यायच नाही
अवजड वाहनांना दिवसा शहराबाहेर रोखण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने ती वाहने इंदिरानगर परिसरातूनच जाणार आहेत. कलानगर सिग्नलजवळ मोठ्या वाहनांसाठी पुरेसा टर्निंग रेडियस नसल्याने येथे वाहतूक ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. इंदिरानगर अंडरपास सुरू झाला तरी काम पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने लागणार असून, तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवावी लागणार आहे. सध्या बस व जड वाहने नसतानाही मुंबईनाका सकाळ-संध्याकाळी कोंडीत सापडतो, हे वास्तव आहे.

अतिरिक्त अमलदार नेमणार
सर्व पर्यायांची चाचपणी केल्यानंतरच मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. सध्या दूसरा पर्याय नाही. जिथे वाहतूक कोंडी किंवा अपघाताची शक्यता आहे, तेथे अतिरिक्त वाहतूक पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन तैनात केले जातील असे अद्विता शिंदे, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक), नाशिक शहर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय;...

0
मुंबई | Mumbaiराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८) विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना...