Friday, May 3, 2024
Homeनाशिकवाहतूक पोलीसा अभावी वाहतूक कोंडी

वाहतूक पोलीसा अभावी वाहतूक कोंडी

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

गोविंद नगर येथील बोगद्या जवळ दुपारच्या वेळी वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

गोविंद नगर बोगदा येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाने याठिकाणी एकतर्फी मार्ग केला व याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली. यामुळे येथील वाहतूक कोंडी चा प्रश्न सुटला होता.

मात्र गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या वेळी याठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे.

दरम्यान येथे वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तरी प्रशासनाने या प्रश्नी गंभीर्याने लक्ष देऊन योग्य ते नियोजन करावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या