सुरगाणा | प्रतिनिधी Surgana
- Advertisement -
तालुक्यात अतिवृष्टी झाली यामध्ये शेतीबरोबरच रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. काही रस्त्यांवरून पुराचे पाणी वाहिल्याने रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत.
बोरगाव ते बर्डीपाडा गुजरात राज्य महामार्गावर तसेच पिंपळसोंड ते सुरगाण्यास जोडणा-या रस्त्यावरील उंबरपाडा तातापाणी येथील पुलावरील फरशी वाहून गेल्याने या मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा मार्गच बंद झाल्याने वाहन चालकांना तीस ते चाळीस किलोमीटरहून अधिक अंतरावरुन सुरगाणा येथे यावे लागत आहे.
हा भाग डोंगराळ; हिंस्र वन्यजीवांचा अधिवास असलेला असल्याने वन्यजीवांचा दिवसा, रात्री मुक्त संचार असतो. त्यामुळे अनेक वेळा अपघताला सामोरे जावे लागते.हा फरशी पुल दुरुस्त करावा अशी मागणी पिंपळसोंड येथील नागरिकांनी केली आहे.




