Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

दुर्दैवी : अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

 

नगरसूल | वार्ताहर

- Advertisement -

 

YouTube video player

अंतापूर ताहाराबाद येथून देव दर्शन करून घरी परत येणाऱ्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला असुन यात नगरसूल(ता.येवला)वडाचा मळा येथील पिता- पुत्राचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.तर पुतण्या गंभीर झाला असल्याची घटना गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मनमाड येथे घडली. अपघात झाल्या नंतर पिकअप गाडीने दुचाकी तब्बल चार किलोमीटर पर्यत फरपटत ओढुन नेली .नागरिकांनी पाठलाग करून गाडी पकडली मात्र चालक फरार झाला आहे.

नगरसूल (ता.येवला)येथील वडाचामळा येथील किशोर ओंकार सोनवणे(वय-४०)ऋतिक किशोर सोनवणे(वय-११)व रवींद्र बाळू सोनवणे (वय-२७)हे पल्सर मोटारसायकल वरून अंतापूर ताहाराबाद येथे देव दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येत असतांना मनमाड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर पहाटे चार वाजेच्या सुमारास मागून येणाऱ्या पिकअप गाडीने पल्सरला जोरदार धडक दिली.धडक इतकी भयंकर होती कि यात किशोर सोनवणे व त्यांचा मुलगा ऋतिक सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला.तर त्यांचा पुतण्या रवींद्र सोनवणे हा गंभीर जखमी झाला.

मनमाड शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 866 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पुढील वर्षीच?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडत लांबल्याचे दिसत आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडणार असून...