Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशHospital Fire : खासगी रुग्णालयाला भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू

Hospital Fire : खासगी रुग्णालयाला भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू

डिंडीगुल । dindigul

तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यातील एका खाजगी रुग्णालयात गुरुवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत एका अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले.

- Advertisement -

पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर रुग्णालयात बचाव कार्य सुरू असताना, लीफ्टमधील सहा जणांचा श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाला. त्यांना तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही, आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य करत आहे. मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन आणि बचाव दलाचं पथक घटनास्थळी रवाना झालं. दोन्ही दलाकडून तातडीनं बचाव कार्याला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं आणि बचावाचं काम सुरू होतं.

आगीच्या घटनेनंतर काही वेळातच डिंडीगूलचे जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. जवळपास तीन तास अथक प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मात्र या दुर्दैवी घटनेत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...