Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्याTrain Accident : ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात! २३८ जणांचा मृत्यू, ९०० हून...

Train Accident : ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात! २३८ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक प्रवासी जखमी

दिल्ली | Delhi

- Advertisement -

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात झाला. या भयंकर अपघातातील मृतांची संख्या 238 वर पोहोचली आहे. 300 च्या आसपास लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातात आतापर्यंत 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.

कालपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे.हा भीषण अपघात झाला तेव्हा या अपघातात 50 ते 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशिरा हा आकडा 120 वर पोहोचला. तसेच जखमींचा आकडाही 350 वर गेला. मात्र, सकाळपर्यंत मृतांचा आकडा 238 आणि जखमींचा आकडा 900 झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या