Sunday, May 26, 2024
Homeदेश विदेश...अन् ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! मथुरामध्ये विचित्र अपघात

…अन् ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! मथुरामध्ये विचित्र अपघात

मथुरा | Mathura

उत्तर प्रदेशात मथुरेत रेल्वे स्थानकावर भीषण अपघात झाला आहे. शकूर बस्ती येथून येणाऱ्या ईएमयू रेल्वे रूळ सोडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली. यावेळी रेल्वेत आणि प्लॅटफॉर्मवर कुणी नागरिक नसल्याने जीवित हानी टळली. अचानक रेल्वे प्लॅटफॉर्मवर आल्याने नगरिकांमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने दाखल घेत नागरिकांना बाजूला केले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही ट्रेन मथुरा स्थानकामध्ये पोहचली. यामधील सर्व प्रवासी उतरले. त्यानंतर रात्री 10 वाजून 55 मिनीटांनी लोको पायलेट इंजिन बंद करुन ट्रेन साईडिंगला लावण्याच्या तयारी होता. त्याचवेळी अचानक इंजिनने वेग पकडला. इंजिन अचानक सुरु झाल्याने लोको पायलेट गोंधळून गेला. मात्र त्याला काही कळण्याच्या आधीच इंजिन ट्रेन स्टॉपर तोडून प्लॅटफॉर्मवर चढलं होतं.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

प्लॅटफॉर्म संपतो त्या ठिकाणी जो उतार असतो त्याच्या बाजूच्या पटरीवरच हा सारा प्रकार घडल्याने इंजिन थेट प्लॅटफॉर्मवर चढलं. प्लॅटफॉर्मच्या दिशेने अचानक अत्यंत वेगाने इंजिन येत असल्याचं पाहून प्लॅटफॉर्मवरील प्रवासी पळू लागले. आपला जीव वाचवण्यासाठी सामान सोडून पळलालेल्या या प्रवाशांकडील सामान मात्र या दुर्घटनेमध्ये इंजिनच्या खाली सापडलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या