Tuesday, May 26, 2026
HomeनाशिकTrambakeshwar News: कडलगचा जामीन अर्ज पुन्हा रखडला; 'या' तारखेला होणार पुढील सुनावणी

Trambakeshwar News: कडलगचा जामीन अर्ज पुन्हा रखडला; ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

नाशिक | प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिरातील बहुचर्चित व्हीआयपी दर्शन आर्थिक लूट प्रकरणात अडकलेले संशयित विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना तूर्तास कारागृहातच राहावे लागणार आहे. कडलग यांनी जामिनासाठी नाशिक सत्र न्यायालयात धाव घेतली असली, तरी त्यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा रखडला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शनिवारी (दि. ३०) होणार आहे. पोलिसांच्या भूमिकेवर अद्याप न्यायालयात युक्तिवाद झालेला नसल्याने कडलगच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

पंचवटी येथील रहिवासी आनंदा सुरेश मेहेंदळे (४६) यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांत याप्रकरणी अधिकृत फिर्याद दिली होती. व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लाखो रुपयांची आर्थिक लूट केल्याचा आरोप संशयितांवर आहे. पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी केलेल्या सखोल तपासात या घोटाळ्यातील लाखो रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत संशयित पुरुषोत्तम मधुकर कडलगसह गोटीराम मनाजी पेहरे, अभिषेक कडलग, ओम कडलग, वसंत उर्फ नारायण कचरू मुर्तडक (मध्यस्थ) या संशयितांना अटक केली असून, सध्या ते नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

- Advertisement -

Nashik News: नाशिकमध्ये मद्यधुंद चालकाचा थरार; कार थेट गोदावरी पात्रात घुसवली!

न्यायालयात नेमके काय घडले?
संशयित पुरुषोत्तम कडलग यांच्या वतीने वकील राहुल कासलीवाल यांनी ८ मे रोजी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर प्राथमिक युक्तिवाद झाला असून ११ मे रोजी सरकारी पक्षाचे म्हणणे सादर होणार होते. मात्र, पोलिसांच्या भूमिकेवर दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद अद्याप होऊ शकलेला नाही. परिणामी, न्यायालयाने ही सुनावणी ३० मे पर्यंत पुढे ढकलली आहे.

ताज्या बातम्या