मुंबई | Mumbai
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची अखेर बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Central Election Commission) राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. तसेच उद्या (दि.०५ नोव्हेंबरपर्यंत) दुपारी एक वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवावे असेही आयोगाने म्हटले आहे. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे.
हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी आढावा बैठक घेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेत्यांनी शुक्ला यांची बदली करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांची अखेर बदली केली आहे. तसेच रश्मी शुक्ला यांची बदली करून पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार शुक्ला यांच्यानंतरच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे (IPS officer) सोपवावा, असेही निर्देश निवडणूक आयोगने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
हे देखील वाचा : Jitendra Awhad : “… ही पाकीटमारांची टोळी”; जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रवादीवर निशाणा
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रश्मी शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी २०२६ पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप केला होता. तसेच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करून विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असेही पटोले यांनी म्हटले होते.
हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “देर आए दुरुस्त…”
फोन टॅपिंग प्रकरणात नाव चर्चेत
रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातील फोन टॅपिंग प्रकरणामध्ये (Phone Tapping Case) चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा