Wednesday, December 4, 2024
Homeदेश विदेशVideo ...तिने राष्ट्रपतींची अशी दृष्ट काढली की,...

Video …तिने राष्ट्रपतींची अशी दृष्ट काढली की,…

पद्म पुरस्कारांचे (Padma Shri)वितरण मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind)यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ तृतीयपंथी कलाकार माता बी मनजम्मा (matha b manjamma) यांचा आहे. तिने राष्ट्रपतींची अशी दृष्ट काढली की पंतप्रधानांपासून ते सभागृहातील मान्यवरांनी टाळ्या वाजवून त्यांच्या कृतीचं कौतुक केलं.

पद्म पुरस्कार स्वीकारणे हा भारतीयांसाठी अभिनानाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षणच आहे. सामान्यपणे राष्ट्रपतींशी हस्तांदोलन करुन पुरस्कार स्वीकारला जातो. मात्र तृतीयपंथी म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या माता बी मनजम्मा या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार घेण्यास गेल्या तेव्हा त्यांनी केलेल्या वेगळ्या शैलीचे सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं.

- Advertisement -

अमिताभ बच्चनच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ५२ वर्ष

पद्म पुरस्कार प्राप्त कर्नाटकची तृतीयपंथी कलाकार माता बी मनजम्मा यांनी पद्मश्री प्राप्त करताना राष्ट्रपती राम नाथ कोविंद (ramnath kovind)यांना त्यांच्या स्वत: च्या शैलीत नजर काढली. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या डोक्यावर आपल्या साडीचा पदर फिरवून, शिड्यांवर बोटं मोडून त्यांनी राष्ट्रपतींची नजर काढली. तेथे उपस्थित लोकांनी त्यांचे हसतमुखाने आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यांचे हात जोडून स्वागत केले.

१०२ वर्षीय शिक्षकांने राष्ट्रपतींना दिला असा आशीर्वाद

ओडिशामधील नंदा किशोर प्रस्टी (Nanda Prusty) हे १०२ युवक शिक्षक आहे. ते फक्त सातवी उत्तीर्ण आहे. परंतु आपल्या जवळपासच्या मुलांना शिक्षित करण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. त्यांना नंदा मास्टर नावाने ओळखले जाते. रोज सकाळी मुले त्यांच्या घरी पोहचतात आणि ते मुलांना ओरिया भाषा व गणित शिकवतात. सकाळपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ते ज्ञानदानाचे कार्य करतात. ते कोणतेही शुल्क (फी) घेत नाही आणि ७० वर्षीय विद्यार्थ्यांना शिक्षित करता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या