Friday, May 3, 2024
HomeजळगावBreaking News चाळीसगाव-सुरत बसमधून दारुची तस्करी

Breaking News चाळीसगाव-सुरत बसमधून दारुची तस्करी

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव आगारातील (st bus) बसमध्ये (Diesel) डिझेल न भरता ते परस्पर विक्री केल्याची घटना ताजी असताना, आता पुन्हा (Chalisgaon-Surat bus) चाळीसगाव-सुरत बसमध्ये गुजरात राज्यात (State of Gujarat) देशी-विदेश दारुची (liquor) चोटरी वाहतुक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे पोलिसांच्या धडक कारवाईत तब्बल ३० हजार रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. हि कारवाई आज(दि,९) संकाळी धुळे बस स्थानकात करण्यात आली. चाळीसगाव आगारात एक-एक गैरप्रकार उघड होत असल्याने चाळीसगाव आगाराची बंदनामी होत असून आगरावर नियंत्रण कोणाचे आहे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

गुजरात राज्यात दारु बंदी असल्याने सुरत येथे एस.टी. बस मधून दारूची चोरटी वाहतुक केली जात असल्याची गुप्त माहिती धुळे पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने आज धुळे शहर पोलिस ठाण्याचे पो.नि. नितीन देशमुख यांनी पथकासह धुळे बस स्थानक गाठले.चाळीसगाव येथून सुरत कडे जाणारी बस क्र.एम.एच.२०/बीएल-३३७५ धुळे बस स्थानकावर सकाळी १२ वाजेच्या दरम्यान उभी होती. पोलीसांनी बसची तपासणी केली असता बसच्या डिक्कीत ३० हजार रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळून आले. बस चालक सुनिल रामदास चव्हाण व वाहक सुभाष सहदेव अहिरे दोन्ही रा.चाळीसगाव यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून बस मधील सुमारे ३० हजार रूपये किंमतीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलिस नाईक कुंदन पटाईत, पो.ना. वैभव वाडीले, पो.कॉ. निलेश पोतदार, प्रविण पाटील, मनिष सोनगिरे, शाकीर शेख, तुषार मोरे, वाहन चालक पो.कॉ. किरण भदाणे यांन केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून आगारात कर्मचार्‍याच्या तक्रारी, डिझेेल चोरी व इतर गैरप्रकारांमुळे चाळीसगाव आगाराची बंदनामी होत आहे. आगरावर नियंत्रण कोणाचे आहे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे चाळीसगाव आगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगल्या आधिकार्‍याची नियुक्ती करावी अशी देखील मागणी होत आहे. तसेच आगारात काही उपद्रवी चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची देखील आगारातून तात्काळ बदली करण्याची देखील गरज आहे.

” चाळीसगाव-सुरत बसमध्ये दारु सापडल्याची माहिती मिळाली आहे. परंतू हा प्रकार धुळे येथे घडला असल्यामुळे धुळे डोपोतून संबंधीत चालकावर कारवाई होणार आहे ”.

संदिप निकम, आगार प्रमुख, चाळीसगाव डेपो

- Advertisment -

ताज्या बातम्या